Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर

गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर

कोल्हापूर :प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

१५ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाली महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडी यांच्यात थेट लढाई होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात निवडणुकीच्या घडामोडी होणार आहेत. (Gokul Milk Union election announced)

संपूर्ण राज्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी घोषणा केली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोककुमार गाडे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिल्यानंतर आज कार्यक्रम जाहीर केला. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल हे निवडणूक कार्यालय असणार आहे. त्याठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत. (Gokul Milk Union election announced)

२५ संचालकांसाठी निवडणूक

न्यायालयीन प्रक्रियेतून तावून सुलाखून निघालेल्या सव्वापाच हजाराहून अधिक दूध संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. यंदाची निवडणूक २५ संचालकांसाठी असून सर्वसाधारण गटातून २० संचालक निवडले जाणार आहेत. महिला दोन आणि अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती जमातीमधून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. (Gokul Milk Union election announced)

असा असेल निवडणूकीचा कार्यक्रम

१५ ते २२ सप्टेंबर : उमेदवारी अर्ज भरणे

२३ सप्टेंबर : उमेदवारी अर्जाची छाननी

२४ सप्टेंबर : वैध अर्जांची यादी प्रसिद्ध

२५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर : अर्ज माघार

९ ऑक्टोबर : उमेदवारांची अंतिम यादी

१८ ऑक्टोबर : मतदान

१९ ऑक्टोबर : मतमोजणी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman