Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनोज जरांगे मुंबईला रवाना

मनोज जरांगे मुंबईला रवाना

जालना : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मनोज जरांगे आज मंगळवारी मुंबईला रवाना झाले. १९ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानात उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांना आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी देण्याचा अर्ज फेटाळला आहे. तरीही जरांगे पाटील कार्यकर्त्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. ऐन गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जरांगे यांनी मुंबईत येऊ नये अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे. (Manoj Jarange departs for Mumbai from Antarwali)

एकजूट राखण्याचे मराठा समाजाला आवाहन

आज सकाळी आंतरवाली सराटी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाला सगळ्यांनी फसवले आहे असा आरोप केला. मराठा समाजाने एकजुट राखावी आणि शांततेचे आवाहन त्यांनी केला. आज सायंकाळी त्याचा पहिला मुक्काम पाटोदा येथे होणार आहे.

गनिमी काव्याने लढण्याचा जरांगेंचा निर्धार

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी गनिमी काव्याने लढण्याचा निर्धार केला आहे. मुंबईकडे मंगळवारी निवडक सहकार्यसमवेत कूच करणार असून आझाद मैदानावर एकट्यानेच उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास कोणीही आंदोलकांनी मुंबईला येवू नये, योग्यवेळी त्यांना सूचना दिली जाईल, असे मनोज जरांगे यांनी सोमवारी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत जाहीर केले. (Manoj Jarange departs for Mumbai from Antarwali)

पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली

जरांगे -पाटील यांनी सरकार मागण्या मान्य करत नसल्याने मुंबईत १९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचे जाहीर केले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना मंजुरी घेऊन आंदोलन करण्याची सूचना केली असताना मुंबई पोलिसांनी मात्र आंदोलनासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे रविवारी आयोजकांनी पुन्हा नव्याने केवळ स्वतः उपोषण करणार असून त्याला संमती देण्यासाठी अर्ज केला असता तोही फेटाळून लावला.त्यामुळे सोमवारी त्यांनी केवळ एकट्याने आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याचे जाहीर केले. त्यासाठी मंगळवारी सकाळी वाजता केवळ दहा सहकाऱ्यांसह आणि दोन रुग्णवाहिकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मी मुंबईला एकटा जातो

ते म्हणाले,”मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही. माझ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. मात्र समाजाने सध्या मुंबईत येऊ नये. मी एकटा मुंबईला जातो आणि योग्य वेळी समाजाला मुंबईत बोलावतो, गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरू असून डॉक्टरांनी सलाईन आणि औषधोपचारामुळे प्रकृतीत काहीसा दिलासा मिळत होता, मात्र मुंबई आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी पाणी आणि औषधोपचार बंद केले आहे. उपचार बंद केल्यानं पोटात आग होण्यास सुरुवात झाली असून उद्या बोलण्यासही त्रास होऊ शकतो, असं त्यांनी सांगितले .आपण मुंबईकडे जात असताना दोन रुग्णवाहिका सोबत असतील. मात्र दहा व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही सोबत येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

“मराठ्यांनी गावं सांभाळावीत”

सध्या मराठा समाजाने आपापल्या गावात सावध आणि सुरक्षित राहावे, महाराष्ट्रभर आंदोलनाला पाठिंबा सुरू ठेवावा आणि शांतता फेऱ्या काढाव्यात, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी केले. मुंबईला जाण्यासाठी जमा केलेल्या गाड्या आणि जेवणाचे साहित्य सध्या वापरू नये, ते नंतर मुंबईत कामी येईल, असेही त्यांनी सांगितले. (Manoj Jarange departs for Mumbai from Antarwali)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman