Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनोज जरांगेंचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित

मनोज जरांगेंचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित

बीड : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी ९० दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाने ऐन गणेशोत्सवात होणार तणाव निवळल्याने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. सरकारच्यावतीने बीड पाटोदा येथे जरांगेशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे आणि आमदार प्रसाद लाड, सुरेश धस यांनी चर्चा करुन जरांगे यांचे मन वळवले. (Manoj Jarange’s protest postponed)

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासंबधित मागण्यासाठी गेले १९ दिवस उपोषण सुरू होते. जरांगेच्या १४ पैकी १३ मागण्या मान्य झाल्या असून एक मागणी पूर्ण झालेली नाही असा दावा सरकारने केला होता. पण १५ सप्टेंबर रोजी जरांगेंनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कुच केले. त्याच दिवशी त्यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्काम केला. पण त्यांचा बीपी आणि शुगर कमी झाल्याने पाटोद्याहून पुढचा मुक्काम थांबला होता. त्यांच्या प्रकृतीला धोका असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मत व्यक्त केले होते. तरीही गुरुवारी दुपारी एक वाजता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सरकारी पातळीवर सुत्र् हालू लागली. सरकारकडून जरांगेशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Manoj Jarange’s protest postponed)

पहाटे पाच वाजता सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेशी चर्चा

पहाटे पाच वाजता सरकारचे शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला पाटोदयात दाखल झाले. त्यामध्ये मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जरांगेसमवेत सुमारे दीड तास चर्चा केली. यावेळी जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे हे माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आले तर मी काय करणार? असा सवाल त्यांनी केला. विखे पाटील चुकत असतील तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेवरावरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले.

सातारा, कोल्हापूर गॅझेटचा तीन महिन्यात जीआर काढणार

जरांगेंच्यावतीने सरकारने हमी दिली असून त्यानंतर त्यांनी ९० दिवसांसाठी आंदोलन स्थगित केले. सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचे गॅझेट तीन महिन्यात जीआर काढून लागु करु. हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारित जीआर काढणार, प्रमाणपत्रांना वैधता दिली जाईल, शिंदे समितीत मिळालेल्या ५८ लाख नोंदी घटवणार नाही. मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्र् वैध करु अशी हमी सरकारकडून दिली आहे. (Manoj Jarange’s protest postponed)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman