Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टीईटी पेपर फुटला, परीक्षा रद्द

टीईटी पेपर फुटला, परीक्षा रद्द

Maharashtra Dinman 0 months ago

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटला. रविवारी होणारी परीक्षा रदद केली असून नवीन परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.

(TET paper leaked)

भिवंडीत तिघांना अटक

भिवंडी येथे टीईटीची प्रश्नपत्रिका मिळणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे टीईटीचा पेपर मिळाला. तिघां संशयितापैकी दोघेजण परप्रांतीय असल्याची माहिती पुढे आली आहे. फुटलेला पेपर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून फुटलेल्या पेपरची पडताळणी केली असता टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे दिसून आल्यावर भिवंडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे. (TET paper leaked)

फुटलेल्या प्रश्नपत्रिकेत समान प्रश्न

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. नीट २०२६ मधील परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन राज्य परीक्षा परिषदेने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. आज २७ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथील काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिसांनी सदर ठिकाणी धाड घातली. त्यानंतर राज्य परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले असल्याचे निदर्शनास आल्यावर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

यापूर्वी दोनवेळा पेपर फुटला होता.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. २०२८ आणि २०१९ झालेल्या परीक्षेत काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोर तपास करुन काहींना अटक करण्यात आली होती. तसेच या गैरप्रकारात सहभागी नऊ हजारांहून अधिक उमेदवारांची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. (TET paper leaked)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman