भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरूनच वाढला आहे. कोणी कोणाचे फोटो वापरणं हा गुन्हा नाही", असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपसोबत जाण्याची वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्षात राहून त्यांचे काम करावे, आम्ही सत्ताधारी आमचे काम करू, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,
जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केलं. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता. राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्याकडे आले होते. आम्ही कोणत्याही नेत्याकडे गेलो नव्हतो. ते आले त्यांनी आम्हाला समर्थनाचं पत्र दिलं. अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी हा आमचा गनिमी कावा होता. तो फसला, हे आम्हाला मान्य आहे. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, ते बाहेर पडले, असेही काल फडणवीस एक वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते.
नागरिकत्वाच्या बाजूने रहा; राज्यात आम्ही राजकीय तडजोड करतो - आशिष शेलार

