Dailyhunt
Beed Crime: नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Beed Crime: नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

  • आई माहेरी गेली, सावत्र पित्याने केला घृणास्पद कृत्य
  • अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार
  • गुन्हा दाखल केला असून आरोपी ताब्यात
बीड:बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
एका नराधम सावत्र पित्याने आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलीची आईला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. मात्र पहिल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे ९ वर्षांपूर्वी त्याच्यापासून फारकत घेतली होती. साधारण ८ वर्षांपूर्वी तिने या नराधम आरोपीशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. ही पीडित मुलगी आपल्या आईसोबत आणि आईने केलेल्या दुसऱ्या पतीसोबत एकाच घरात राहत होती.

९ एप्रिलला पीडित मुलीची आई सकाळी 11:30 वाजता आपल्या माहेरी गावाकडे गेली होती. यावेळी घरात केवळ पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊच हजर होते. दुपारी 12:30 च्या सुमारास सावत्र पिता घरी आला आणि त्याने मुलीकडे तिच्या आईबद्दल चौकशी केली. आई कधी परत येणार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने मुलीला आईला फोन करायला लावला. आईने फोनवर परत यायला वेळ लागेल असे सांगितले. त्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला विचलित करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला खाली बसवले. त्यांनतर मुलीला कॉटवर बसवून तिच्यासोबत लज्जास्पद चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने याला कडाडून विरोध केला आणि आईला सांगण्याची धमकी दिली, मात्र आरोपीने “आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील” असे धमकावत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

आई माहेरून परत आली आणि…

काही वेळाने पीडितेची आई माहेरून परत आली. तेव्हा तिला आपली मुलगी कोपऱ्यात बसून रडतांना दिसली. मुलगी प्रचंड घाबरलेली होती ती काहीही बोलत नव्हती. अखेर तिला विश्वासात घेऊन मायेने विचारणा केल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेल्या त्या काळ्या कृत्याची सर्व माहिती आईला सांगितली. हे ऐकताच आईला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

गुन्हा दाखल

१२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध गु. र. नं. 198/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64 (3)(एफ), 65 (1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra