- मुसळधार पावसामुळे जळगावातील रस्त्यांवर पाणी साचून खड्ड्यांची समस्या गंभीर
- पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण
- महापालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली
- पालकमंत्र्यांनी शहराच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी
मुख्य रस्त्यावर खड्डे
शहरातील टॉवर चौक, महापालिका सतरा मजली इमारत, गोविंदा रिक्षा स्टॉप, चित्रा चौक, न जुने बसस्थानक, घाणेकर चौक, आदी भागातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेले दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने रस्त्यांवर खड्याचे साम्राज्य उभ राहिलं असून काही भागात तर खड्यामुळे अपघात होतात.
रस्त्यावर पाण्याचे तलाव
एकीकडे रस्त्यात साचलेल्या खड्यात पाणी तर दुसरीकडेन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केलेले रस्ते. पण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय न केल्यामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी सांचले आहे. स्त्याचा एक भाग वाहतूकीसाठी बंद करावा लागला. दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, याबाबतही आता लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी सांडपाणी निचरा करण्याचे उपाययोजना करण्याची गरज आहे.
Jalgaon News: ‘या’ प्रकरणाने उडवली संस्थाचालक, माजी … – Navarashtra
रेल्वे स्टेशनभागातही पाणी
रेल्वे स्टेशनभागातही पाणीच पाणी साचलेले आहे. बाहेरगावावाहून येणाऱ्या लोकांना तसेच बाहेरगावी लोकांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. नेहरू चौकापासून पावसाचे पाणी स्टेशनपर्यंत येते परंतु त्यांच्या निचरा कुठेही होत नाही.
महापालिका निष्क्रीय
महापालिका शहरातील नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी निष्क्रीय ठरत आहे. नागरीकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही पदाधिकारी व अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वातारण तयार होत आहे.
नटवर चौकातही तलावासारखी स्थिती
शहरातील मुख्य भागात नटवर टाकीज समोरील जयप्रकाश नारायण चौकातही पाण्याचा तलाव साचला आहे. त्यामुळे वाहन काढणेही कठीण झाले. महापालिकेने अनेकवेळा या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्या निष्फळ ठरल्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असते. त्यावर गेल्या अनेक वर्षांत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
Jalgaon News: भरधाव कारने हिरावला संसाराचा आधार; पत्नी-मुलाचा …
पालकमंत्र्याचीही जळगावबाबत अनास्था
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव शहरातील नागरिकांच्या सुविधाबाबत अनास्था दिसून येत आहे. शहरातील नागरीकांच्या समस्याबाबत ते एकदाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नाहीत. त्याना सूचनाही करीत नाही तसेच जळगाव शहरात कामे करण्यासाठी नधीची काय अडचण आहे? याची माहितीही घेत नाहित. त्यामुळे आज जळगाव शहर वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री शहराचे नव्हे तर केवळ ग्रामीणचेच आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी आता तरी जळगाव शहरातील या प्रश्नाकडे लक्ष देवून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही नागरीकांकडून होत आहे.

