Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रविवारी (दि.२) सकाळी १० वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग १३९८१ क्युसेकने वाढवून एकूण २०७७९ क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पुढील काळात विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे, वाहने किंवा अन्य साहित्य असल्यास ते तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

Maharashtra Rain Update : पुढील 24 तास महत्त्वाचे ! 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग

महाराष्ट्रात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथा, सातारा, महाबळेश्वर आणि पुणे विदर्भात सगळीकडे मुसळधार कोसळत आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पुण्यात अति ते अति जोरदार पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचले आहे. वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपत्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपत्रात 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra