Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..

Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..

नागपूर, महानगर रिपोर्टर. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले आहेत. मात्र, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेत मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती केल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.

शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे म्हणणे आहे की, त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रातील अध्यापनात अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालया मार्फत राज्यात अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून वर्ग सुरू झाले आहेत.मात्र, याच कालावधीत सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत शासकीय आणि अनुदानित शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे नियमित अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, अकरावीत प्रवेश घेणारे विद्यार्थी प्रथमच महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात. अशावेळी शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणासोबतच शैक्षणिक मार्गदर्शनावरही परिणाम होत आहे.

NagpurCity: लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

  • शिक्षण विभागाने लक्ष द्यावे
  • विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षण विभागाने लक्ष द्यावे

विजुक्ताचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी सांगितले, अकरावीच्या शिक्षणावरच बारावीचे शिक्षण अवलंबून असते. सत्राच्या अखेरीस अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे बारावीचे शिक्षण सुरू होते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. शिक्षक एसआयआरच्या कामात गुंतल्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. या बाबीकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षक भारती संघटनेचे प्रा. सपन नेहरोत्रा यांनी सांगितले, अकरावीचे वर्ग सुरू झाले असले तरी ५० टक्क्यांहून अधिक शिक्षक एसआयआरच्या कामात व्यस्त आहेत.
एकीकडे शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत आहे तर दुसरीकडे शिक्षकांना राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.
याशिवाय आधीपासूनच शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra