- उपाय न केल्याने पसरतेय आग
- प्रभावी पाऊले उचलण्यात अकार्यक्षम
- आगीच्या ज्वाळांमध्ये सुरु कोळसा लोडींग
- जळालेल्या कोळसा ग्राहकांना पुरवल्याचा आरोप
सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला आग मर्यादित स्वरूपाची होती. मात्र, वेळेत आवश्यक उपाययोजना न केल्याने पसरत गेली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आगीच्या ज्वाळांमध्ये सुरु कोळसा लोडींग
घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळांजवळ कोळसा डम्परमध्ये भरला जात असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये डम्पर आणि लोडर कार्यरत असून, त्यामध्ये चालक असल्याचेही दिसते. आग लागलेल्या परिसरात यंत्रसामग्री कशी कार्यरत ठेवली, याबाबत व्यवस्थापनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
जळालेल्या कोळसा ग्राहकांना पुरवल्याचा आरोप
आग लागलेल्या ठिकाणाहून कोळसा बाहेर काढून त्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप काही ग्राहकांकडून करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी उच्च दर्जाचा कोळसा मिळावा यासाठी ५० ते १४८ टक्क्यांपर्यंत अधिक दर मोजल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतरही जळालेला कोळसा पुरविला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Nagpur Crime : फरार "इक्का" ला २४ तासांत केले जेरबंद
‘स्वच्छ नागपूर’चा प्रचार; मुख्यालयातील फलकच जीर्ण
एकीकडे वेकोलिकडून’ स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रचार केला जात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मुख्यालय परिसरातील फलक अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित फलक गंजलेला आहे. तो धोकादायक अवस्थेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. फलकाची तातडीने दुरुस्ती अथवा बदल करण्याची मागणी होत आहे.

