Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nagpur Crime : फरार "इक्का" ला २४ तासांत केले जेरबंद

Nagpur Crime : फरार "इक्का" ला २४ तासांत केले जेरबंद

नागपूर, क्राईम रिपोर्टर, हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पोलिसांना गुंगारा देत पसार झालेला घरफोडीचा सराईत आरोपी इक्का ऊर्फ हर्ष महेंद्र रामटेके (२५) याला अवघ्या २४ तासांत तिरोडा येथून जेरबंद केले, तिरोडा पोलिसांनी त्याला अटक करून हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले.

कोठडीतून आरोपी पसार झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करणे हे हुडकेश्वर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे आव्हान ठरले होते. विविध पथके रात्रंदिवस शोधमोहीम राबवत होती. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि तिरोडा पोलिसांच्या समन्वयातून आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

Farmer Suicides : कर्ज माफीत नाव नाही , शेतकऱ्याची आत्महत्त्या : यवतमाळ मध्ये टोकाचे पाऊल
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला इक्का न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडीत होता. सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजता शौचालयाला जाण्याचा बहाणा करून त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला आणि पळ काढला. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिस, गुन्हे शाखा आणि विशेष पथकांनी त्याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. आरोपी सुरुवातीला एमआयडीसी परिसरात फिरत होता.
त्यानंतर दुचाकीवरून विविध ठिकाणी फिरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मामाच्या गावी तिरोडा येथे जाऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबरींच्या आधारे आरोपी तिरोड्यात असल्याचे स्पष्ट झाले. हुडकेश्वर पोलिस तेथे पोहोचण्यापूर्वीच आरोपी पुन्हा पसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी तिरोडा पोलिसांशी संपर्क साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलिसांनी संभाव्य ठिकाणांवर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी तिरोडा गाठून आरोपीला नागपुरात आणले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा अटक केली.

संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
पोलिसांच्या माहितीनुसार, इक्का हा सराईत घरफोड्या असून, त्याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडी आणि चोरीचे १९ गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी १८ मे २०२५ रोजी तो वैद्यकीय रुग्णालयातूनही पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. मात्र, त्यावेळीही पोलिसांनी त्याला दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. या प्रकरणात पोलिस कोठडीतून आरोपी कसा पसार झाला, याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. आरोपीविरुद्ध पोलिस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra