- कार्यकारणी द्वारे राज्य सरकारला विनंती
- दोन एकर जागेत साहित्य संकुल उभारण्याची मागणी
जागा ही आजही कधीच वापरलेली नाही.
दिलेल्या १० कोटींचे काय झाले याविषयी विचारणा झाली. हे १० कोटी रुपये फिक्स केले असून, त्याचे ८२ लाख रुपये व्याज संस्थेकडे जमा आहे. हा व्याजातील पैसा ग्रंथालय, जिल्हा शाखा, त्यांचे प्रस्तावित कार्यक्रम, संमेलनांसाठी खर्च करण्याची शासनाची अट आहे. या रकमेतून खर्चास मान्यता देण्याची विनंती शासनाकडे केल्याचे डॉ. गांधी यांनी सांगितले. सभेला अरुणा सबाने, बाळ कुळकर्णी व चंद्रकांत लाखे, सरचिटणीस विलास मानेकर, माधुरी साकुळकर, शुभदा फडणवीस, आसावरी तिडके, श्रीपाद अपराजित यांच्यासह ७० सदस्य उपस्थति होते.
Farmer Suicides : कर्ज माफीत नाव नाही , शेतकऱ्याची आत्महत्त्या : यवतमाळ मध्ये टोकाचे पाऊल
नाट्यगृह हे सुरूच होऊ शकत नाही . नाट्यगृहाचे निर्माण हेच वि. सा. संकुल उभारणीचा मूळ हेतू होता. परंतु, हे नाट्यगृह आजवर सुरू होऊ शकले नाही. अग्निशमन व्यवस्थेच्या दृष्टीने बिल्डरने काही कामे सुरू केली आहे. परंतु, नाट्यगृहासाठी पार्किंगचा प्रश्न या इमारतीत सुटणे आता शक्य नाही. तसेच फायरच्या ना हरकत प्रमाणपत्राचीही अडचण येणारच असल्याने हे नाट्यगृह कधीच सुरू होऊ शकत नसल्याचेही डॉ. गांधी यांनी रविवारी सांगितले.
Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..
गुप्त बैठकीवर प्रश्नचिन्ह
विदर्भ साहित्य संघाच्या काही कार्यकारिणी सदस्यांची गुप्त बैठक सोमवारी धंतोली येथील भाजपच्या कार्यालयात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही खाजगी बैठक असल्याचे सांगण्यात येत असले तरी. वि. सा. संघाचे पदाधिकारी भाजप कार्यालयात बैठक घेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेते उपेंद्र कोठेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यापैकी माधुरी साकुळकर, श्याम घोड, श्रीपाद अपराजित, विष्णू मनोहर व इतर काही सदस्य बैठकीला उपस्थित होते. ही बैठक कशासाठी होती? काय चर्चा झाली? याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र, रविवारीच वि. सा. संधाची सर्वसाधारण सभा साई सभागृहात पार पडली आणि सभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

