Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आता ₹१० मध्ये मिळणार रिलायन्सची आइसक्रीम

आता ₹१० मध्ये मिळणार रिलायन्सची आइसक्रीम

NEWS डंका 2 weeks ago

अंबानींच्या नव्या खेळीने बाजारात खळबळ

रिलायन्सने टेलिकॉम आणि शीतपेयांच्या बाजारानंतर आता थेट आइसक्रीमच्या बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने 'बॉम्बे क्रीमरी' या नव्या ब्रँडच्या माध्यमातून आइसक्रीम बाजारात पाऊल ठेवले असून, या आइसक्रीमची सुरुवातीची किंमत अवघी १० रुपये ठेवण्यात आली आहे.

कप, कोन, टब, बार आणि स्टिक अशा विविध प्रकारांमध्ये ही आइसक्रीम उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला पश्चिम भारतात या उत्पादनाची विक्री सुरू करण्यात आली असून, त्यानंतर देशभरात विस्तार करण्याची रिलायन्सची योजना आहे.

रिलायन्सच्या या स्वस्त दराच्या खेळीमुळे आइसक्रीम बाजारातील अमूल, मदर डेअरी, क्वालिटी वॉल्स, वाडीलाल आणि अरुण यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही लोकप्रिय आइसक्रीम स्टिकची बाजारातील सुरुवातीची किंमत सुमारे २० रुपये आहे. अशा वेळी रिलायन्सने प्रवेशाची किंमत थेट १० रुपयांपासून ठेवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 'बॉम्बे क्रीमरी'मध्ये अस्सल डेअरी क्रीमचा वापर केला जाणार असून, परवडणाऱ्या दरात दर्जेदार आइसक्रीम देण्यावर भर असेल.

'भारत आमच्यासाठी देवासारखा' नेपाळमधील पूरग्रस्तांनी मानले आभार

अल्पवयीन मुलीशी शरियानुसार निकाह केला तरी 'पॉक्सो' लागणार

रिलायन्सची ही रणनीती यापूर्वीच्या 'कॅम्पा'च्या आक्रमक प्रवेशाची आठवण करून देणारी आहे. कॅम्पा कोला कमी किमतीत बाजारात आणल्यानंतर शीतपेय क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली होती. आता त्याच धर्तीवर आइसक्रीम बाजारातही किंमत आणि वितरण नेटवर्कच्या जोरावर मोठा हिस्सा मिळवण्याचा रिलायन्सचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. भारतातील आइसक्रीम बाजार वेगाने वाढत असून, वाढती मागणी, ऑनलाइन दहा मिनिटांच्या डिलिव्हरी सेवांचा विस्तार आणि छोट्या शहरांमध्ये वाढणारी बाजारपेठ यामुळे रिलायन्सला मोठी संधी मिळू शकते. कंपनीच्या मजबूत वितरण व्यवस्थेमुळे 'बॉम्बे क्रीमरी'ची उपलब्धता वाढवणेही तुलनेने सोपे ठरणार आहे. त्यामुळे १० रुपयांच्या आइसक्रीममधून रिलायन्सने सुरू केलेली ही नवी स्पर्धा पुढील काळात ग्राहकांसाठी अधिक पर्याय आणि कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka