Dailyhunt
अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री!

अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री!

NEWS डंका 2 months ago

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात वाहिली श्रद्धांजली

हाराष्ट्राला अजितदादांच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता पण ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं असतं.

त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणीतं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व अजित दादांचे होते, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अजित पवार यांनी यावेळी आपल्या राजकीय कारकीर्दीतील १२वा अर्थसंकल्प सादर केला असता. हे गेल्या काही वर्षातील असे पहिलेच अधिवेशन होते ज्यात अजित पवार नव्हते. त्यावरून सगळे आमदार भावून झाले होते. फडणवीसांनी अजित पवारांविषयी बोलताना सांगितले की, राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत, सगळ्याच दादांनी चांगले काम केले. पण महाराष्ट्रामध्ये वसंत दादा आणि अजित दादा ही दोन नाव अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता याठिकाणी लक्षात ठेवेल.

इस्रायलकडून भारताला 'हेक्सागन ऑफ अलायन्सेस'मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव

पहाटेची प्रेरणा, शिस्तीची ताकद आणि सकारात्मकतेची साथ

मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया एल मेंचो मेक्सिकोमधील लष्करी कारवाईत ठार

समुद्राखालील डिजिटल महामार्ग

अजित दादांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांना एखादा निर्णय पटला नाही तर स्पष्ट सांगायचे. मंत्रिमंडळातील प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास दादा करायचे. राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवला. मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दादा मला मुख्यमंत्री बोलायचे. १२ वाजता कार्यक्रम असेल तर दादा पोहोचायचे ११.५९ला.

सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या प्रत्येक वाक्यात अजित दादांचं नाव घेतलं जायचं. त्यातून अजित दादांचा परिचय हा काम करणारा मंत्री म्हणून झाला. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहातो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे कोणत्याही नेत्याकरीता त्यापेक्षा मोठा दुसराही ठेवा असू शकत नाही' असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, 'खर म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच. पण त्यांच्या कुटुंबाला, सुनेत्रा वहिनींना जे दु:ख झालं ते आपण समजू शकतो. पण या कठीण परिस्थितीतही वहिनींनी अतिशय धीरोदत्तपणे त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी कठोर निर्णय घेतला. अत्यंत संयमी, घरंदाज पद्धतीने त्यांनी हे कार्य हातामध्ये घेतलं आहे. आपल्या सदभावना त्यांच्या पाठीशी आहेत. राजकीय क्षेत्रात व्यक्तिगत वेदना बाजूला ठेऊन समाज, राज्य याचा विचार करत आपल कर्तव्य त्याठिकाणी बजावत रहावं लागतं. मला विश्वास आहे, वहिनी देखील दादांसारखी आपली वेगळी प्रतिमा तयार करतील.

दादांचा आरएसएसशी संबंध?

'दादांचा जन्म राहुरी तालुक्यातला होता. दादांचे मामा कदम हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा आरएसएसचे पदाधिकारी होते. दादांच बालपण मामाच्या घराकडे गेलं असल्याने त्यांच्या कार्याची जाणीवदेखील होती' असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. '

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka