Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंबादास दानवे जिंकले. पण महायुतीतून

अंबादास दानवे जिंकले. पण महायुतीतून

NEWS डंका 2 weeks ago

त्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक, महायुतीचा महाविजय

'छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होते. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळविले.

२०पैकी १९ जागा महायुतीने जिंकल्या तर महाविकास आघाडीला अवघी १ जागा मिळाली. विशेष म्हणजे उबाठा शिवसेनेचे विधान परिषदेतील नेते अंबादास दानवे हे महायुतीतून जिंकले.

बँकेवर महायुतीने या ऐतिहासिक विजयासह आपला झेंडा फडकवला आहे. बँकेच्या एकूण जागांपैकी बहुतांश जागांवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. महाविकास आघाडीचे कल्याण काळे हे एकमेव उमेदवार जिंकून आले.

बरे झाले, उद्धव ठाकरेंना श्रीरामाची आठवण झाली!

विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता

६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध

दिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरित १२ जागांसाठी मतदान पार पडले. या १२ पैकी तब्बल ११ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीने रिंगणात उतरवलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे विजयी ठरले. बाकीच्यांचा दारुण पराभव झाला.

महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विजय मिळवला आहे. ते महायुतीकडून लढले याबद्दलच आश्चर्य व्यक्त होत होते. त्यांच्यासह मंत्री अतुल सावे आणि भाजप आमदार अनुराधा चव्हाण, शिवसेना आमदार संजना जाधव या नेत्यांनीही बाजी मारली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka