Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्धाला नवे वळण

अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्धाला नवे वळण

५०% आयात शुल्काला कॅनडाचे 'जशास तसे' उत्तर

मेरिका आणि कॅनडामधील व्यापार तणाव पुन्हा वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार करारासाठी सुरू असलेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर चर्चा फिस्कटली.

त्यानंतर अमेरिकेने कॅनडातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लागू केला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सुमारे २० अब्ज डॉलरच्या कॅनेडियन वस्तूंवर होणार आहे.

अमेरिकेच्या या निर्णयाला कॅनडानेही कडक उत्तर दिले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या आयात शुल्काला 'डॉलर फॉर डॉलर' म्हणजेच जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे अमेरिकेने कॅनेडियन वस्तूंवर जितका कर लावला आहे, तितकाच कर कॅनडाही अमेरिकन वस्तूंवर लावणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आता निवृत्तीनंतरही 'श्वान जवान' पोलिसांसोबतच राहणार

रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

सोन्याची रेकॉर्डब्रेक झेप! भाव १.६२ लाखांवर

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यापार करारासाठी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र शेवटच्या टप्प्यातही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती होऊ शकली नाही. कॅनडाने अमेरिकेच्या काही नव्या अटी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर चर्चा थांबली. कॅनडाने आपले वाटाघाटी पथकही परत बोलावले आहे.

अमेरिकेच्या नव्या टॅरिफचा परिणाम कॅनडाच्या काही उद्योगांवर होऊ शकतो. हॉकी स्टिक्स, सिमेंट, मद्य आणि काही औद्योगिक वस्तूंसह विविध उत्पादनांना या शुल्काचा फटका बसणार आहे. अमेरिकेच्या मते हा निर्णय देशातील उद्योग आणि रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. मात्र कॅनडाने हे शुल्क अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

या व्यापार संघर्षाचा परिणाम केवळ अमेरिका आणि कॅनडापुरता मर्यादित राहणार नाही. दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणावर असल्याने पुरवठा साखळी, उत्पादन खर्च आणि ग्राहकांच्या किमतींवरही दबाव वाढू शकतो. त्यामुळे पुढील काळात अमेरिका-कॅनडा व्यापार संबंध कोणत्या दिशेने जातात, याकडे संपूर्ण जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka