Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोन्याची रेकॉर्डब्रेक झेप! भाव १.६२ लाखांवर

सोन्याची रेकॉर्डब्रेक झेप! भाव १.६२ लाखांवर

चांदीही २.४६ लाखांच्या पार

सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून, सोन्याचा भाव १० ग्रॅममागे तब्बल १ लाख ६२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, एमसीएक्सवर चांदीने किलोमागे २ लाख ४६ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ६० हजार ४९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४७ हजार १०० रुपये नोंदवला गेला आहे. एका दिवसात सोन्या-चांदीच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या बजेटवरही त्याचा परिणाम होत आहे.

या तेजीमागे अमेरिकी डॉलरची कमजोरी, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल ही प्रमुख कारणे आहेत. डॉलर कमजोर झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने इतर चलनांतील गुंतवणूकदारांसाठी तुलनेने स्वस्त ठरते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून दरांना आधार मिळतो. त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता, वाढते सरकारी कर्ज आणि वित्तीय तूट यामुळेही गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत.

संभल हिंसाचारातील सूत्रधार शारिक सट्टाविरोधात रेड कॉर्नर नोटीस

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'आधी पुण्यात राडा

मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित

पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळेही सोन्याला मागणी मिळत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाचा दर ९३ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याने महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक निर्णयांचा सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्याने या दरावर गुंतवणूक करावी का, असा प्रश्न आता गुंतवणूकदारांसमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, एवढ्या उच्च पातळीवर एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरू शकते. गोल्ड ईटीएफ किंवा एसआयपीच्या माध्यमातून नियमित आणि मर्यादित गुंतवणूक करण्याचा पर्यायही विचारात घेता येऊ शकतो. मात्र, पुढील काळात डॉलरची दिशा, अमेरिकेचे व्याजदर, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक परिस्थिती यावर सोन्या-चांदीच्या दरांची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka