Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेच्या हिताकडे झुकलेला पाकिस्तान योग्य मध्यस्थ नाही!

अमेरिकेच्या हिताकडे झुकलेला पाकिस्तान योग्य मध्यस्थ नाही!

NEWS डंका 0 months ago

इराणच्या खादाराकडून पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका पार पाडत असून आता पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

एका इराणी खासदाराने सुरू असलेल्या प्रादेशिक वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर शंका उपस्थित केली असून, राजनैतिक टप्प्यावर तटस्थतेविषयी चिंता दर्शवली आहे.

दश्तेस्तानचे प्रतिनिधित्व करणारे आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते असलेले इब्राहिम रझाई म्हणाले की, मध्यस्थीसाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता पाकिस्तानकडे नाही. एका निवेदनात त्यांनी पाकिस्तानला चांगला मित्र आणि शेजारी म्हटले, परंतु तो एक योग्य मध्यस्थ नाही आणि अमेरिकेच्या हितांशी जुळवून घेण्याकडे त्याचा कल असतो, असा युक्तिवादही केला. रेझाई यांनी पुढे असा आरोप केला की, इस्लामाबाद वॉशिंग्टनवर उघडपणे टीका करणे टाळते आणि त्यांच्या मते, अमेरिकेने लेबनॉनच्या बाबतीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. 'मध्यस्थ निष्पक्ष असला पाहिज, तो नेहमीच एका बाजूला झुकलेला नसावा.' असे ते पुढे म्हणाले.

अनिश्चितता असूनही वाटाघाटी जिवंत ठेवण्यासाठी अब्बास अराघची यांनी राजनैतिक प्रयत्न तीव्र केले असतानाच, त्यांनी ही टिप्पणी केली आहे. अराघची यांनी अलीकडेच तीन दिवसांत दुसऱ्यांदा इस्लामाबादला भेट दिली, जिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी संघर्ष आणि पुढील संभाव्य मार्गांवर चर्चा केली. इराणचे परराष्ट्र मंत्री ओमानहून येण्यापूर्वी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांला भेटले होते, जिथे त्यांनी सुलतान हैथम बिन तारिक अल-सैद यांच्याशी चर्चा केली होती. तेथील चर्चेत होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा आणि व्यापक राजनैतिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, ही चर्चा अणुप्रश्नाच्या पलीकडे जाऊन, होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर चौकटीचे प्रस्ताव, नुकसान भरपाईच्या मागण्या, पुढील लष्करी कारवाई न करण्याची हमी आणि अमेरिकेने लादलेले सागरी निर्बंध उठवणे यांसारख्या विषयांनाही स्पर्श करत आहे. इस्लामाबादमधील मुक्कामानंतर, अराघची मॉस्कोला भेट देणार आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितली गौतम बुद्धांच्या संदेशांची महत्ता

बांबू उद्योगामुळे बदलत आहे ईशान्य भारतातील महिलांचे जीवन

मुंबई 3.O - स्वप्नांच्या नगरीचा पुढचा अध्याय!

टीसीएस प्रकरण बनावट असल्याचा डाव्यांचा अजब सत्यशोध

दरम्यान, अमेरिका-इराण संघर्ष सोडवण्याच्या राजनैतिक प्रयत्नांचा जोर ओसरत असताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर तेहरानला वाटाघाटी करायच्या असतील तर ते थेट संपर्क साधण्यास स्वतंत्र आहेत. वॉशिंग्टनने स्वतःच्या प्रयत्नांमधून माघार घेतल्यानंतर आणि पाकिस्तानमधील नियोजित चर्चेची फेरी रद्द केल्यानंतर ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka