Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंधेरीत सापडले ४ कोटींचे ड्रग्ज

अंधेरीत सापडले ४ कोटींचे ड्रग्ज

NEWS डंका 2 weeks ago

रॅकेट उद्ध्वस्त; उत्तराखंडच्या दोघांना बेड्या

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने (ANC) अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, कांदिवली युनिटने अंधेरी परिसरात धडक कारवाई केली आहे.

वर्सोवा येथील यारी रोड परिसरातून दोन ड्रग तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी रुपये किमतीचे ७६५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.अरमान अयुब मलिक (३२)रा. डेहराडून, उत्तराखंड,दानिश भूरा अली (२३) रा. हरिद्वार, उत्तराखंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कांदिवली एएनसी युनिटने १० मे २०२६ रोजी पहाटे ३ च्या सुमारास यारी रोड परिसरात छापा टाकला. यावेळी दोन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे हेरॉईनचा साठा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ अंतर्गत एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

भारताने वर्षभर सोनं खरेदी करणं टाळल्यास किती कोटींची होईल बचत?

तारीक रेहमान करतायत चीन-पाकिस्तानसोबत गुटर्गू?

हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला केले अनफॉलो?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती; सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरला

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत मोठी असल्याने, हे केवळ स्थानिक विक्रेते नसून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य टोळीचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे ड्रग्स मुंबईत कोणाला पुरवले जाणार होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती,सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka