Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

NEWS डंका 3 weeks ago

सुरक्षा दलांची मोठी कारवाई

जम्मू-काश्मीरमधील अनेक हल्ल्यांप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना हवा असलेला लष्कर-ए-तोयबाचा (LeT) प्रमुख दहशतवादी सुलेमान शाह उर्फ मूसा याचा खातमा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

मंगळवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मूसा ठार झाला. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील युसमार्गच्या कोराग परिसरात ही कारवाई करण्यात आली.

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी इतर सुरक्षा दलांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान जवानांना संशयास्पद हालचाली आढळल्या. जवानांनी संशयित दहशतवाद्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख सुलेमान शाह उर्फ मूसा अशी केली आहे. दूधपत्री वनक्षेत्रात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीर पंजाल पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंनी गेल्या काही वर्षांत झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये मुसाचा कथित सहभाग होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून त्याचा शोध घेतला जात होता. युसमार्गच्या डोंगराळ भागात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या चकमकीतूनही तो बचावून निसटला होता. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या त्या चकमकीत मुसाचा जवळचा सहकारी यासिर ठार झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलांकडून मुसाचा शोध सुरू होता. अखेर युसमार्ग परिसरात झालेल्या कारवाईत त्याचा खात्मा करण्यात आला.

हे ही वाचा:

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप 'बाळा' पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

आंदोलन केले तर 'कॉक्रोच'ना दादरकर देणार दणका

दरम्यान, सुलेमान शाह उर्फ मूसा ठार झाल्याने जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांना मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka