Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

NEWS डंका 3 weeks ago

४९ जणांचा मृत्यू

भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातील एका बाजाराजवळ म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ४९ जण ठार झाले असून ५८ जण जखमी झाले आहेत.

म्यानमारच्या लष्कराच्या या हवाई हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, एका बाजाराजवळील परिसराला लक्ष्य करून हा हवाई हल्ला करण्यात आला. म्यानमारचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मंडालेच्या पश्चिमेला सुमारे ३४० किमी (२१० मैल) अंतरावर असलेल्या क्यौक्ताव टाउनशिपमध्ये हा हल्ला झाला. हा परिसर रखाइनमध्ये कार्यरत असलेल्या 'अराकान आर्मी' या शक्तिशाली सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. हल्ल्यात झालेल्या जीवितहानीची माहिती अराकान आर्मी आणि बचावकार्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे. अराकान आर्मीने मंगळवारी पहाटे जारी केलेल्या निवेदनात हल्ल्यासाठी जबाबदार व्यक्ती आणि संघटनांविरोधात लवकरच प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अराकान आर्मीने आरोप केला आहे की, जाणूनबुजून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने या हल्ल्याबाबत तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, लष्कर यापूर्वीपासून आपल्या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य केवळ लष्करी तळ असल्याचे सांगत आले आहे. तसेच लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या संघटनांवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही म्यानमारच्या लष्कराकडून केला जातो.

तृणमूलचे इंद्रनील सेन यांच्या घरावर ईडीची धाड

अमेरिकेत भारतीय उद्योगसमूह एस्सारचा 'पोलादी' विस्तार

उज्जैनमधील मशिदीच्या वादात एआय व्हिडीओने पेटवली अफवांची ठिणगी

२०२१च्या लष्करी उठावानंतर संघर्ष सुरू

म्यानमारमध्ये १ फेब्रुवारी २०२१ रोजी लष्कराने आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेले सरकार सत्तेतून हटवले. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली. सुरक्षा दलांनी ही निदर्शने बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या अनेक गटांनी शस्त्रे हाती घेतली. तेव्हापासून म्यानमारच्या मोठ्या भागात संघर्ष सुरू आहे.

अराकान आर्मी ही रखाइनमधील जातीय अल्पसंख्याक समुदायाला अधिक स्वायत्तता मिळावी, या मागणीसाठी लढणारी सशस्त्र संघटना आहे. या संघटनेने नोव्हेंबर २०२३ मध्ये रखाइनमध्ये लष्कराविरोधात लष्करी कारवाई सुरू केली. त्यानंतर संघटनेने राज्यातील १७ पैकी १४ टाउनशिपवर तसेच एका महत्त्वाच्या प्रादेशिक लष्करी मुख्यालयावर नियंत्रण मिळवले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka