Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भिवंडीत चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

भिवंडीत चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

NEWS डंका 3 weeks ago

बचावकार्य सुरू

भिवंडीतील बालाजी नगर- गंगारामवाडी परिसरात गुरुवारी (३० जुलै) मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. कोहिनूर अपार्टमेंट या चार मजली निवासी इमारतीची 'बी' विंग अचानक कोसळल्याने आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रात्री सुमारे ९ वाजल्यापासून इमारतीत तडे जाण्याचे आणि मोठा आवाज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे काही रहिवाशांनी तत्काळ इमारतीबाहेर धाव घेतली आणि इतरांनाही बाहेर पडण्यास मदत केली. मात्र काही रहिवासी बाहेर पडत असतानाच 'बी' विंग क्षणार्धात कोसळली.

महापालिकेच्या नोंदीनुसार, कोहिनूर अपार्टमेंटमध्ये एकूण ४८ खोल्या होत्या. ही इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली होती आणि रहिवाशांना नोटीसही बजावण्यात आली होती. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याच दरम्यान इमारत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेमके कारण मात्र चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचाव पथके दाखल झाली. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वानपथक, रुग्णवाहिका आणि जेसीबीसह जड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. बचाव पथकांनी काही जखमींना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.

पाकिस्तानमधील ब्रॉड पीकवर हिमस्खलन; १० गिर्यारोहक बेपत्ता

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर

ऑगस्टमध्येही बरसणार मान्सून; पावसाची तूट कमी होऊन १४ टक्क्यांवर

मोदींच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मेटा इंडियाच्या प्रमुखांविरोधात गुन्हा

दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी अनेकजण बचाव पथकांकडून माहिती घेत आहेत. प्रशासनाने नागरिकांना धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहन केले असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka