Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास

बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास

हिंदू एकता आंदोलनाकडून पोलिसांकडे तक्रार

बिसूर गावामध्ये मशिदी शेजारी राहणाऱ्या दहा हिंदू कुटुंबीयांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याला एका पत्राद्वारे कळवले होते की, बिसूर गावामध्ये असणाऱ्या मशिदीमध्ये गावाबाहेरील वीस ते पंचवीस मुस्लिम लोक जमातीच्या नावाखाली मशिदीमध्ये येतात व मशिदीमध्ये वास्तव्य करतात मशिदीमध्ये जोरात बोलणे, मोबाईलवर जोरात गाणी वाजवणे, हिंदू महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणे असे प्रकार चालू आहेत.

तरी हिंदू लोकांनी त्यांना विरोध केल्यावर तुमची दारे, खिडक्या बंद करून घ्या, अशी धमकी देत आहेत. तरी सदर हिंदू कुटुंबीयांनी गावातील नेतेमंडळी व प्रतिष्ठित लोकांना सांगून सुद्धा हे प्रकार बंद झाले नाहीत. म्हणून तेथील हिंदू कुटुंबीय सदरच्या मशिदीतील मुस्लिम लोकांना वैतागून बिसूर गाव सोडण्याच्या तयारीत आहेत अशा मजकुराचे पत्र हिंदू एकता आंदोलन संघटना सांगलीला आलेले होते.

सदरचे सह्या करणारे हिंदू कुटुंबीयाची नावे, सह्या, पत्ते हे बिसूर गावातील मशिदी शेजारील लोकांचे आहेत. बिसूर गावातील मशिदीमध्ये गावातील राहिवाशी मुस्लिम सोडून जिल्ह्यातील व राज्यातील मुस्लिमांना वास्तव्य करण्यास परवानगी देऊ नये अशी गावकऱ्यांनी पत्रात केलेली मागणी योग्य असून बिसूर गावा शेजारी गाव बुधगाव मधील ग्रामस्थांनी ग्रामसभेत बुधगाव मशिदीमध्ये बुधगाव सोडून बाहेरील मुसलमान वास्तव्यास बंदीचा ठराव महासभेत केलेला आहे. तशा पद्धतीने बिसूर गावातील मशिदीमध्ये गावातील राहिवाशी मुस्लिम सोडून जिल्ह्यातील व राज्यातील मुस्लिमांना वास्तव्यास बंदीचा आदेश ग्रामपंचायतिने बुधगाव गावा प्रमाणे ठराव करावा किंवा प्रशासनाने तसा आदेश द्यावा.

ध्रुव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या!

राष्ट्रवादी बंगाली तरुणांना हाक, लवकरच २.५ लाख युवक होणार संघस्वयंसेवक

पाकिस्तानने भारताशी स्पर्धा न करता अंतर्गत प्रश्न सोडवावे!

व्हेनेझुएला भूकंपानंतर आठ दिवस ढिगाऱ्याखाली… अखेर चमत्कार!

तरी बिसुर मधील मशिदीमध्ये बाहेरील देशातील बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंगे यांनी वास्तव्य करू नये यासाठी आम्ही सदर पत्राच्या आधारे निवेदन दिले आहे. तसेच गावात बाहेरून येणाऱ्या जमातीच्या लोकांच्या मुळे गावात वातावरण बिघडले तर त्यांना पाठीशी घालणारे गावातील नेते मंडळी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, माजी सरपंच हे जबाबदार राहतील. अशा आशयाचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आज देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जाधव, राजू जाधव, पै. प्रदीप निकम, अनिरुध्द कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, दिग्विजय शिंदे, हार्पितसिंघ गौड, दिग्विजय शिंदे, राम काळे, विकास आवळे पदाधिकारी उपस्थित होते

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka