Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रिक्समध्ये भारताची मोठी रणनीती

ब्रिक्समध्ये भारताची मोठी रणनीती

NEWS डंका 1 month ago

मलेशिया-इथिओपियासोबत संरक्षण, गुंतवणुकीला बूस्टर

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताने मलेशिया आणि इथिओपियासोबत संरक्षण, गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशिया आणि इथिओपियाच्या नेत्यांसोबत केलेल्या द्विपक्षीय चर्चेत संरक्षण सहकार्य, संरक्षण साहित्याची खरेदी, भारतीय कंपन्यांची गुंतवणूक, खाण क्षेत्र आणि सेमीकंडक्टर उद्योगावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही देशांनी भारतासोबत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेषतः लष्करी कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण, क्षमता विकास आणि भारताकडून संरक्षण क्षेत्रातील विविध घटकांची खरेदी करण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली. भारत सध्या संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासोबतच संरक्षण निर्यातीला मोठी चालना देत असल्याने मलेशिया आणि इथिओपियाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद भारतीय संरक्षण उद्योगासाठी नव्या बाजारपेठांची दारे उघडणारा ठरू शकतो.

या चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी. इथिओपियाने आपल्या खाण आणि खनिज क्षेत्रात भारतीय कंपन्यांचे स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे. महत्त्वपूर्ण खनिजांचा विश्वासार्ह आणि दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत संसाधनसमृद्ध आफ्रिकी देशांसोबत व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे इथिओपियातील खाण क्षेत्र भारतीय कंपन्यांसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते. त्याचबरोबर संरक्षण खरेदी आणि संयुक्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारत-इथिओपिया संबंधांचा सामरिक पाया अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा हाफिज सईदविरोधात अजामीनपात्र वॉरंट

पश्चिम आशियातील तणावाचा तेलबाजाराला झटका

एनएसईचा आयपीओ २२,६०० कोटींवर

दुसरीकडे, मलेशियासोबतच्या चर्चेत सेमीकंडक्टर क्षेत्र केंद्रस्थानी राहिले. सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रात मलेशियाचे महत्त्वाचे स्थान असून जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी ही भागीदारी फायदेशीर ठरू शकते. भारतीय आणि मलेशियन कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान तसेच औद्योगिक गुंतवणुकीचे नवे मार्ग यामुळे खुले होण्याची शक्यता आहे. एकूणच, ब्रिक्सच्या मंचावरून भारताने पारंपरिक व्यापार आणि राजनैतिक संबंधांच्या पलीकडे जात संरक्षण उत्पादन, सामरिक खनिजे, सेमीकंडक्टर आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये आपली जागतिक भागीदारी विस्तारण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka