Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षांच्या मुलीवर हत्येचा गुन्हा

दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षांच्या मुलीवर हत्येचा गुन्हा

मुंबईतील गोरेगावातील धक्कादायक घटना

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नागरिक निवारा परिसरातील शिवशाही प्रकल्पाच्या इमारत क्रमांक १ मध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अवघ्या १० वर्षांच्या मुलीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आरिबा खान ही चिमुकली आपल्या घराबाहेर मांजरीसोबत खेळत होती. काही वेळाने ती दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, तिच्या मोठ्या भावाला इमारतीच्या डक्टमध्ये ती खाली पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, कुटुंबीयांनी सखोल तपासाची मागणी केल्यानंतर पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासादरम्यान, इमारतीत राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुकलीला लिफ्टजवळ बोलावून डक्टमध्ये फेकल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध बाबींचा तपास केला जात आहे.

एसबीआयच्या ३,८९७ ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची प्रतिमा डागाळू नका!

टायगर प्रकरणात दादर कनेक्शन…दोन तरुणीही कटात सामील

दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तिचे वय लक्षात घेऊन समुपदेशन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीची मानसिक परिपक्वता, घटनेमागील पार्श्वभूमी आणि नेमका हेतू यांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. एका बाजूला चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे या घटनेमुळे लहान मुलांच्या वर्तनामागील कारणे, त्यांच्यावर होणारे संस्कार आणि त्यांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या धक्कादायक घटनेचे नेमके सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka