कुटुंबाने घेतला कॉर्निया दानाचा निर्णय
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील पीजी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १९ वर्षीय अर्पित जजच्या कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगी एक मोठा निर्णय घेत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
अर्पितच्या कुटुंबीयांनी त्याचे कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक बाहेरील भाग) दान करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या डोळ्यांमुळे आता दुसऱ्या व्यक्तीला दृष्टी मिळण्याची शक्यता आहे.
अर्पित हा दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयात बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. रविवारी सत्य निकेतन येथील पाच मजली पीजी इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत अर्पितसह सात जणांचा मृत्यू झाला. अर्पित काही तासांपूर्वीच मध्य प्रदेशातून दिल्लीला परतला होता. त्याने कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरे केले होते. अर्पितच्या कुटुंबासाठी हा निर्णय अत्यंत भावनिक असला, तरी त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो, या भावनेतून त्यांनी कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शोकाकुल कुटुंबाने अवयवदानाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
ब्रिटनला नेलेले नागा पूर्वजांचे ३९ अवशेष भारतात आणणार
महिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद
दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?
'उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे'
अर्पित शिक्षणासाठी दिल्लीमध्ये राहत होता. तो चार्टर्ड अकाउंटन्सीच्या परीक्षेचीही तयारी करत होता. रविवारी सकाळी तो मध्य प्रदेशातून दिल्लीला परतला आणि दुपारी पीजीची इमारत कोसळली. या दुर्घटनेनंतर अर्पितच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला. अखेर रुग्णालयात त्याची ओळख पटली. या दुर्घटनेनंतर पीजी इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने दिल्लीतील पीजी हबमधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

