वकिलांनी दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला खळबळजनक वळण
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सोमवारी खळबळजनक माहिती समोर आली. रिपब्लिक टीव्हीवर या प्रकरणातील दिशा सालियनची बाजू मांडणारे वकील ऍड.
ओझा यांनी सांगितले की, या प्रकरणातील महत्त्वाची माहिती देण्याची तयारी सचिन वाझे याने दाखविलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित १३ लोकांचे खून झाले त्याविषयी माहिती देण्याची त्याची तयारी आहे.
रिपब्लिकवर ओझा यांनी सांगितले की, दिशा सालियन प्रकरणात एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे तो आरोपी पण आहे. तो आहे सचिन वाझे. सचिन वाझेच्या वतीने प्रस्ताव घेऊन काही लोक आपल्याकडे आले होते. यात त्यांच्यातर्फे ऑफर देण्यात आली की, सचिन वाझे १३ खुनांमध्ये या प्रकरणाशी संबंध असलेल्या प्रकरणात तो आहे आणि त्याची माहिती देण्यास तयार आहे.
दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?
'उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे'
आशिया कप फायनलआधी ट्रॉफीचा पेच!
लखीमपूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या खलीलचे केले एन्काऊंटर
ओझा म्हणाले की, ९ जून २०२०ला दिशाचा मोबाईल रोहन रायकडून घेण्यात आला. त्यानेही ती कबुली दिली. पण नंतर तो फोन ऍक्टिव्ह दिसला. पण त्याबद्दल सांगितले गेले की, सुशांतच्या मृत्यूनंतर तो चेक करण्यासाठी सुरू करण्यात आला. हेदेखील मीडिआत प्रसिद्ध झालेले आहे. पण केवळ एक दिवस नव्हे तर अनेक दिवस तो फोन सुरू होता. त्यात बराच मोठा डेटा वापरला गेला. ज्या डेटाबाबत आमच्याकडे माहिती देण्यात आली की, आदित्य ठाकरे, सचिन वाझे यांनी या फोनमधील डिटेल काढले. दिशाने ती गुप्त माहिती कुणाकुणाला दिलेली आहे आणि त्या लोकांना कसे लक्ष्य करता येईल, याचा माहिती त्यांनी काढली. जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा पोलिसांनी सांगितले की, आम्ही तो फोन जप्त केलाच नव्हता. पण हे खोटे आता मीडियातही उपलब्ध आहे.
ओझा म्हणाले की, जर पोलिसांकडे हा फोन होता तर तो इतके दिवस का होता आणि त्या फोनचा गैरवापर का करू दिला गेला? आम्ही आता ही माहिती सीबीआयकडे देणार आहे. आता सीबीआय आणि सचिन वाझे काय ते बघतील. महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी आमचे आणखी एक साक्षीदार उदय सहाय यांना धमकी दिली आहे. असेच सचिन वाझे यांच्याबद्दल होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. म्हणून सचिन वाझेसंदर्भात ही माहिती आम्ही देत आहोत. आणखी एक साक्षीदार या प्रकरणात आहे, त्याचीही माहिती आम्ही लवकरच देऊ.
ऍड. ओझा यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे या प्रकरणाला काही वेगळे वळण मिळेल का, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

