Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देणारे 'मिट्टी कॅफे'

दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देणारे 'मिट्टी कॅफे'

दिव्यांग तरुण-तरुणींना रोजगाराची संधी देणारा अनोखा उपक्रम

आकाशात भरारी घ्यायची असेल, तर केवळ सहानुभूती पुरेशी नसते; स्वतःच्या पंखांमध्ये बळ असावे लागते. हाच विचार प्रत्यक्षात उतरवणाऱ्या 'मिट्टी कॅफे'चे एक आउटलेट मुंबईतील बोरिवली येथील स्काय सिटी मॉलमध्ये सुरू झाले आहे.

दिव्यांग व्यक्तींना केवळ मदतीचा आधार देण्याऐवजी त्यांना कौशल्य, रोजगार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या कॅफेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

मिट्टी कॅफे हा केवळ खाद्यपदार्थांचा व्यवसाय नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा विचार घेऊन उभा राहिलेला उपक्रम आहे. आलिया अमन यांची ही संकल्पना असून, दिव्यांगांसाठी गेल्या ३० वर्षांपासून शाळा चालवणाऱ्या लता नायक या त्यांच्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्या. दिव्यांग तरुण-तरुणींना त्यांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

शारीरिक दिव्यांगत्व असलेल्या तसेच ऑटिझमसारख्या स्थितीचा सामना करणाऱ्या तरुण-तरुणींना या कॅफेमध्ये काम करण्याची संधी मिळते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना कामातील कौशल्ये आत्मसात करता येतात, आत्मविश्वास वाढवता येतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मार्ग खुला होतो. समाजाकडून मिळणाऱ्या सहानुभूतीपेक्षा स्वतःच्या कर्तृत्वातून मिळणारा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे, हा संदेश मिट्टी कॅफे आपल्या कार्यातून देत आहे.

मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार!

ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट

अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर बस उलटून आठ जणांचा मृत्यू

या कॅफेचे पहिले आउटलेट नवी मुंबई विमानतळावर सुरू झाले, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या कॅफेचे उद्घाटन झाले. आता स्काय सिटी मॉलमधील तिसऱ्या कॅफेच्या माध्यमातून हा उपक्रम आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. येत्या काळात राजभवनातही मिट्टी कॅफे सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपालांनी यावेळी केली. विशेष अतिथी म्हणून भाजप आमदार अतुल भातखळकर हे ही यावेळी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka