Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर बस उलटून आठ जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर बस उलटून आठ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या कोटाजवळ दुर्घटना

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर राजस्थानमधील कोटा जिल्ह्याजवळ शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी भीषण अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली.

या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील कराडिया परिसरात, सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून घसरून जवळच्या खड्ड्यात पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात पाणी आणि चिखल साचल्यामुळे बचावकार्यात अडथळे आले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. जखमींना कोटा येथील एमबीएस रुग्णालय आणि न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

'जागा सोडून जा' म्हणत मालवणीत हिंदूंवर हल्ला

दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

भारतापुढे दबाव फोल; ट्रम्प यांची शुल्कवाढीवरून माघार

महाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

प्राथमिक माहितीनुसार, ही बस मध्य प्रदेशातून खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी प्रवाशांना घेऊन जात होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून अपघातासंदर्भातील पुढील माहिती गोळा केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka