Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एचडीएफसी बँकेच्या नव्या सीईओची घोषणा

एचडीएफसी बँकेच्या नव्या सीईओची घोषणा

NEWS डंका 3 weeks ago

अनूप बागची सांभाळणार बँकेची धुरा

एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वात मोठा बदल होणार असून, अनूप बागची यांची बँकेच्या पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ २७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने २ ऑक्टोबरपासून बागची यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्तीही मंजूर केली आहे. मात्र, या नियुक्तीसाठी भागधारकांची आवश्यक मंजुरी घेणे बंधनकारक आहे.

अनूप बागची हे तीन दशकांहून अधिक काळ वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना बँकिंग, भांडवली बाजार, गुंतवणूक बँकिंग, डिजिटल वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्राचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी १९९२ मध्ये आयसीआयसीआय समूहातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१७ ते २०२३ या काळात आयसीआयसीआय बँकेत त्यांनी किरकोळ, व्यावसायिक आणि ग्रामीण बँकिंग तसेच घाऊक बँकिंगशी संबंधित व्यवसाय पाहिला. जून २०२३ पासून ते आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे MD & CEO म्हणून कार्यरत आहेत.

फुकेतला चाललेली २१ कोटींच्या केटामाइनची तस्करी उधळली

वेदांता राजस्थानातील तेल उत्पादन दुप्पट करणार

एचडीएफसी बँकेचे विद्यमान MD & CEO शशिधर जगदीशन यांचा कार्यकाळ २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यांनी पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून बागची एचडीएफसी बँकेची धुरा सांभाळतील. आयसीआयसीआय समूहातील दीर्घ अनुभव असलेले बागची आता देशातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील बँकेचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल होण्याबरोबरच बँकेच्या पुढील व्यवसायविस्तार आणि वित्तीय सेवांच्या विविध क्षेत्रांतील वाटचालीकडेही लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka