Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वेदांता राजस्थानातील तेल उत्पादन दुप्पट करणार

वेदांता राजस्थानातील तेल उत्पादन दुप्पट करणार

NEWS डंका 3 weeks ago

२,००० कोटींची गुंतवणूक

राजस्थानातील बाडमेर येथील तेलक्षेत्रांमधून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी वेदांता समूहाने मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी राजस्थानातील मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्या या प्रमुख तेलक्षेत्रांमध्ये सुमारे २०० दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

जुन्या तेलक्षेत्रांमधील उत्पादनात नैसर्गिकरीत्या होत असलेली घट रोखणे आणि उपलब्ध तेलसाठ्यांचा अधिक कार्यक्षम वापर करणे हा या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या विहिरी आणि तेल पुनर्प्राप्तीच्या प्रगत पद्धतींच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

बाडमेरमधील मंगला तेलक्षेत्र हे वेदांतासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, सध्या येथून दररोज सुमारे ८० हजार बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होत आहे. हे उत्पादन वाढवून दररोज १ लाख ५० हजार बॅरलपेक्षा अधिक करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्यासाठी पॉलीमर फ्लडिंगसह विविध प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जुन्या विहिरींमध्ये आवश्यक तांत्रिक हस्तक्षेप करून त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. मंगला क्षेत्राचा तेल पुनर्प्राप्ती दर सध्या सुमारे ४१ टक्के असून, तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.

मक्कातील ग्रँड मशिदीत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न? सौदीकडून स्पष्टीकरण

राहुल गांधींनी गौरवलेल्या 'मोहम्मद दीपक'ला धमकी प्रकरणी अटक
देशातील कच्च्या तेलाची मागणी सातत्याने वाढत असताना देशांतर्गत उत्पादनात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे भारताचा आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशातील विद्यमान तेलक्षेत्रांचा अधिकाधिक वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. राजस्थानातील तेलक्षेत्रे वेदांताच्या एकूण उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे बाडमेरमधील उत्पादन वाढवण्याच्या या गुंतवणुकीकडे कंपनीच्या ऊर्जा व्यवसायासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. उत्पादन वाढल्यास देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उपलब्धतेला काही प्रमाणात हातभार लागण्याबरोबरच राजस्थानातील ऊर्जा क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka