Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एचडीएफसी बँकेला धक्का; सीईओ जगदीशन पदावरून पायउतार

एचडीएफसी बँकेला धक्का; सीईओ जगदीशन पदावरून पायउतार

NEWS डंका 3 weeks ago

२६ ऑक्टोबरला कार्यकाळ संपणार

चडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार असून, त्यानंतर ते बँकेच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत.

शशीधर जगदीशन यांनी शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. संचालक मंडळाने त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती; मात्र त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शशीधर जगदीशन यांचा एचडीएफसी बँकेसोबतचा प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. १९९६ मध्ये वित्त विभागातील व्यवस्थापक म्हणून त्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये वित्त विभागाचे प्रमुख आणि २००८ मध्ये मुख्य वित्त अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ऑक्टोबर २०२० मध्ये आदित्य पुरी यांच्यानंतर त्यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींमध्ये एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे ऐतिहासिक विलीनीकरण होते. या मोठ्या प्रक्रियेत शशीधर जगदीशन यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

एव्हरेस्ट, लालजी गोधू हिंगावर बंदी

चिराग पासवानांचा मांझी पिता-पुत्रांना राजीनाम्याचा सल्ला

दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याची घोषणा बँकेसमोरील काही आव्हानांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अंतर्गत कारभाराबाबत यापूर्वी प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी संबंधित ठेवींच्या व्याजदराच्या प्रकरणात अंतर्गत चौकशीनंतर शशीधर जगदीशन यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणांनंतरही बँकेने नेतृत्वबदलाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास ३० वर्षे एचडीएफसी बँकेसोबत काम केल्यानंतर शशीधर जगदीशन यांच्या निवृत्तीमुळे बँकेच्या नेतृत्वात मोठा बदल होणार आहे. आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याकडे बँकिंग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka