भारतातील चित्रपटाची नेट कमाई २३७.१३ कोटी रुपये
विशाल चतुर्वेदी लिखित आणि दिग्दर्शित आध्यात्मिक चित्रपट 'हनुमान अंश' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने ४१ दिवसांत जगभरात ३००.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सहाव्या आठवड्यात कमाईचा वेग काहीसा मंदावला असला, तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे.
आकडेवारीनुसार, चित्रपटाने ४१व्या दिवशी म्हणजेच सहाव्या बुधवारच्या दिवशी भारतात ६ कोटी रुपयांची नेट कमाई केली. मंगळवारी चित्रपटाने ८.२५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात कमाईत सुमारे २७.३ टक्क्यांची घट झाली. यानंतर भारतातील चित्रपटाची एकूण नेट कमाई २३७.१३ कोटी रुपये झाली असून, भारतातील ग्रॉस कमाई सुमारे २८० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिनेमाचा परदेशातील कमाईचा वेग सहाव्या आठवड्यातही कायम राहिला. सोमवारी आणि मंगळवारी चित्रपटाने प्रत्येकी २ कोटी रुपयांची कमाई केली, तर बुधवारी परदेशातून १.७५ कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन नोंदवण्यात आला. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई २०.२५ कोटी रुपये झाली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून 'हनुमान अंश'ने जगभरात ३००.२५ कोटी रुपयांचा टप्पा गाठला.
विशेष म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कमाईचा वेग तुलनेने कमी होता. मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कमाईत पुढील आठवड्यांमध्ये मोठी वाढ झाली. पहिल्या आठवड्यात १.०८ कोटी, दुसऱ्या आठवड्यात ४० लाख आणि तिसऱ्या आठवड्यात १०.४० कोटी रुपये नेट कमाई झाली. चौथ्या आठवड्यात हीच कमाई ६१ कोटींवर, तर पाचव्या आठवड्यात तब्बल ९०.२५ कोटी रुपयांवर पोहोचली. सहाव्या आठवड्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाने चांगली कमाई केली. सहाव्या शुक्रवारी १०.५० कोटी, शनिवारी १८.५० कोटी आणि रविवारी २२.५० कोटी रुपये कमावले. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी प्रत्येकी ८.२५ कोटी, तर बुधवारी ६ कोटी रुपये मिळाले.
अतिककडून जप्त केलेल्या जमिनीवरील घरात मोदींचा थाटात वाढदिवस
यूपीआयवरून काँग्रेसमध्येच विरुद्ध दिशेला तोंडे
उपोषण सोडून जरांगेंची मुंबई दौऱ्यातून माघार
'दहशतवादी गुहेत लपून नव्हते, सुरक्षित वातावरणात होते'
'हनुमान अंश' हा नीम करोली बाबा अर्थात महाराज-जी यांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित आध्यात्मिक चित्रपट आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शोहिनव सत्यया यांनी नीम करोली बाबांची भूमिका साकारली असून पूर्णिमा तिवारी, चंदन आनंद, विहान शेडगे आणि अनिल रस्तोगी हे कलाकारही चित्रपटात आहेत.

