Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हाफिज सईदबद्दल प्रश्न विचारताच शरीफ पळाले

हाफिज सईदबद्दल प्रश्न विचारताच शरीफ पळाले

NEWS डंका 0 months ago

संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात शहबाज यांची कोंडी

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ ८१व्या संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचले. मात्र, यावेळी दहशतवादाशी संबंधित प्रश्नांवर ते उत्तर देण्याचे टाळताना दिसले.

माध्यमांतील वृत्तानुसार, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्यानंतरही शहबाजशरीफ यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये शहबाजशरीफ संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचताना दिसत आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना, 'तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देणे कधी बंद करणार?' असा प्रश्न विचारला. मात्र, शरीफ यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे जात असताना दिसत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून बाहेर पडतानाही पत्रकारांनी त्यांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारला. 'तुम्ही लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर खटला कधी चालवणार?' असा सवाल पत्रकारांनी केला. यावेळीही शरीफ यांनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि त्यांनी पत्रकारांसमोरून पळ काढला. शहबाजशरीफ यांना संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दहशतवादाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. दोन्ही वेळा त्यांनी उत्तर न देता पुढे जाणे पसंत केले. त्यामुळे या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

हाफिज सईद हा पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आहे. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून, अमेरिकन सरकारने त्याच्यावर १ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारताच्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात तो वॉन्टेड आरोपी आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या व्यापक कटातही हाफिज सईदचे नाव आरोपी म्हणून नमूद केले आहे.

मोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत 'मेक इन इंडिया'ची मोठी भरारी

शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!

'पेजर आठवतात का?' नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न

साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा

दरम्यान, यापूर्वी बुधवारी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. इस्लामाबादने प्रादेशिक महत्त्वाकांक्षा बाळगण्याऐवजी आणि सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याऐवजी कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या आणि संघर्ष करणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे, असे भारताने म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka