Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा

साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा

NEWS डंका 0 months ago

फोन अनलॉक झाल्यास तपासाला मिळणार वेग

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात तपास करणाऱ्या मुंबई क्राइम ब्रँचसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. साहिलच्या आयफोन-१७ फोनला पॅटर्न लॉक असून, त्याच्या परिचितांनाही या लॉकची माहिती नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पोलिसांना सध्या फोनमधील डेटा मिळवता आलेला नाही.

फोन अनलॉक झाल्यास या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे. विशेषतः, १८ सप्टेंबर रोजी परीक्षेदरम्यान साहिलने फोनवर नेमके काय सर्च केले आणि परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासोबत काय घडले, याची माहिती फोनमधून मिळू शकते.

१८ सप्टेंबर रोजी परीक्षेदरम्यान साहिलने मोबाइल फोनचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला हे साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत. साहिल दुपारी सुमारे १२.३८ वाजता परीक्षा हॉलमधून बाहेर पडला आणि सुमारे १.२५ वाजता आपल्या हॉस्टेलच्या खोलीत परतला. या सुमारे ४७ मिनिटांच्या कालावधीत नेमके काय घडले, याचा क्राइम ब्रँचकडून तपास केला जात आहे. परीक्षा हॉलपासून हॉस्टेलपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साहिल कुठे गेला आणि या काळात त्याच्यासोबत काय घडले, याचा शोध घेतला जात आहे.

साहिलकडे आयफोन-१७ होता. जुन्या आयफोन मॉडेलमधून डेटा मिळवण्यासाठी पोलिसांकडे असलेली फॉरेन्सिक साधने सक्षम आहेत. मात्र, नव्या मॉडेलमधून डेटा मिळवताना अडचणी येत आहेत. फोनमधील डेटा एन्क्रिप्टेड असल्याने पॅटर्न लॉकशिवाय तो अनलॉक करणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी साहिलचा लॅपटॉपही ताब्यात घेतला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तपासाचा भाग म्हणून परीक्षा हॉल, कॅम्पस आणि हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी केली जात आहे.

महिलेचा मॉर्फ फोटो वापरल्याप्रकरणी दिपके चौकडीवर गुन्हा

ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत व्यापार, तैवान, एआयवर चर्चा

पश्चिम बंगालमधील २५० मदरशांवर लागणार टाळे

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

या प्रकरणी सुरुवातीला पवई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला. आतापर्यंत संस्थेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासह २० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची तसेच परीक्षेवर देखरेख करणाऱ्या शिक्षकांचीही चौकशी करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka