Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
होर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

NEWS डंका 2 weeks ago

ओमान किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाजाला भीषण आग

गातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणशी संबंधित क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन व्यापारी जहाजांचे नुकसान झाले असून ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे जागतिक तेलपुरवठा, समुद्री वाहतूक आणि मध्यपूर्वेतील सुरक्षेबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या किमान दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये जहाजांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचवेळी ओमानच्या लिमाह किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजाला अज्ञात प्रोजेक्टाइलची धडक बसल्याने जहाजाच्या इंजिन विभागात आग लागली. ब्रिटनच्या UK Maritime Trade Operations (UKMTO) संस्थेनेही या घटनेची पुष्टी केली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीतील हल्ले थांबवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी तात्पुरती शस्त्रसंधीही स्वीकारली होती. मात्र आता झालेल्या नव्या हल्ल्यांमुळे तो करार जवळपास निष्प्रभ ठरल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यांनंतर अमेरिकेने थेट इराणवर बोट ठेवले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी इराणवर व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले आहे. काही अहवालांनुसार, अमेरिकेकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईचाही विचार सुरू आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे पाचव्या भागाएवढ्या कच्च्या तेलाची वाहतूक होते. त्यामुळे या भागातील कोणतीही लष्करी घटना जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. जहाजावरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलीकडील हल्ल्यांमुळे आखाती समुद्री मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जहाज कंपन्या सुरक्षा उपायांचा फेरआढावा घेत असून काही जहाजांनी पर्यायी मार्गांचा विचार सुरू केला आहे. समुद्री विमा खर्च वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी चंपतराय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमती, वाहतूक खर्च, महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील प्रत्येक घडामोडीकडे जगभरातील सरकारे आणि ऊर्जा बाजाराचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka