Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
होर्मुझचा तिढा सुटेना! अमेरिकेचा प्रस्ताव इराणने नाकारला

होर्मुझचा तिढा सुटेना! अमेरिकेचा प्रस्ताव इराणने नाकारला

अणुचर्चेलाही इराणचा नकार

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असून इराणने अमेरिकेच्या अटी फेटाळल्या आहेत. अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावातील सात अटींवरील प्रतिसाद इराणने अपुरा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.

आपल्या काही मागण्यांबाबत अमेरिकेने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याचा आरोप इराणने केला आहे. तसेच, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासही इराणने सध्या नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याऐवजी संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराणचे सुरक्षा प्रमुख आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी अमेरिकेच्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली. इराणने अमेरिकेसमोर सात अटी ठेवल्या असून, त्यांची पूर्तता होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकेसाठी खुली केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने काही अटी मान्य केल्या असल्या, तरी इतर अटींबाबतची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याचे रझाई यांनी सांगितले. त्यामुळे पुढील वाटाघाटी करण्यापूर्वी अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी इराणची मागणी आहे.

उदयवीर सिद्धूची सुवर्णकामगिरी

मणिपूरातील ताज्या हिंसाचारात ९ लोकांचा मृत्यू

नेपाळमध्ये पुन्हा पुराचे संकट

'व्होट चोरी'चा पुरावा मागितल्याने महिला पत्रकारावर मिरची स्प्रे

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील सुमारे एक पंचमांश तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूची वाहतूक या मार्गातून होत होती. त्यामुळे या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठा, तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचे परिणाम होऊ शकतात. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या जलमार्गाचा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिका राजनैतिक प्रयत्न करत असली, तरी अटींवर एकमत होत नसल्याने तोडगा निघण्यास विलंब होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka