Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इमारतीवरून पडलेली महिला झाडावर अडकली

इमारतीवरून पडलेली महिला झाडावर अडकली

NEWS डंका 3 weeks ago

अग्निशमन दलाने केली सुटका

मुंबईतील भांडुप पश्चिम येथील तुळशेतपाडा परिसरात इमारतीवरून पडलेली २६ वर्षीय महिला झाडावर अडकल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेला झाडावरून सुरक्षित खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतीक्षा अंकुश हिवराळे (२६) असे जखमी महिलेचे नाव आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास तुळशेतपाडा येथील सनशाइन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या इमारतीतून महिला खाली पडल्याची माहिती मिळाली. इमारतीखालील झाडावर ती अडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी महिलेला झाडावरून खाली उतरवले.

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा!

देशात घरांच्या किमती वाढल्या, पण खरेदीचा वेग मंदावला!

भारत-चीन आर्थिक संबंधांना नवी दिशा; गुंतवणुकीसाठी फ्रेमवर्कची तयारी

त्यानंतर तिला मुलुंड जनरल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. सध्या तिच्यावर सायन रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. महिला रुग्णालयात दाखल असल्याने तिचा जबाब नोंदविता आलेला नाही. याबाबत पोलिसांनी इंडॉसमेंट घेतले असून, महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रतीक्षा हिवराळे यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. महिला इमारतीवरून नेमकी कशामुळे पडली, याबाबत तिचा जबाब नोंदवल्यानंतरच अधिक स्पष्टता येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka