Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इम्रान खान तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात रवाना

इम्रान खान तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात रवाना

सध्या तातडीच्या उपचारांची गरज नसल्याचे स्पष्ट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र काही तासांतच त्यांना पुन्हा तुरुंगात हलवण्यात आले.

इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तुरुंगात ठेवणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पुन्हा रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आणण्यात आले.

इम्रान खान यांना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) पहाटे अदियाला तुरुंगातून शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांना विशेष वैद्यकीय तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा समावेश असलेल्या वैद्यकीय पॅनेलकडून तपासणी करण्याचेही आदेश दिले होते.

७३ वर्षीय इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबीय आणि PTI ने त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः त्यांच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीमध्ये मोठी घट झाल्याचा दावा त्यांच्या कायदेशीर पथकाकडून करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारकडील वैद्यकीय अहवालांनुसार त्यांची प्रकृती सध्या तातडीच्या उपचारांची गरज भासेल इतकी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली

९ पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर सावधान! २४ ऑगस्टपासून नवा नियम

'भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक'

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

इम्रान खान यांना खासगी रुग्णालयात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाकिस्तान सरकारने यापूर्वी आव्हान दिले होते. तुरुंगातील कैद्यांना शक्यतो सरकारी रुग्णालयातच उपचार मिळावेत, अशी सरकारची भूमिका होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर खान यांना शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांनी इम्रान खान यांची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांना तुरुंगात ठेवणे सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा अदियाला तुरुंगात हलवण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka