Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

पीटीआयचा मोठ्या आंदोलनाचा इशारा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची भीती लष्कराच्या रावळपिंडी येथील जनरल हेडक्वार्टर्समधील (जीएचक्यू) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

इम्रान खान सध्या रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना, वकिलांना, पक्षातील नेत्यांना आणि वैयक्तिक डॉक्टरांना त्यांची भेट घेण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मृत्यूच्या अफवांना पुन्हा हवा मिळाली आहे. पीटीआयने इम्रान खान यांची स्वतंत्र वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे.

वजाहत सईद खान यांनी १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये जीएचक्यूमधील तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान खान जिवंत नसल्याची भीती व्यक्त केल्याचा दावा केला. मात्र, या अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांना स्वतः पाहिलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा दावा अपुष्ट आणि केवळ सूत्रांवर आधारित असल्याचे त्यांनीच नमूद केले आहे.

इम्रान खान यांच्यापर्यंत कुटुंबीय, डॉक्टर आणि पक्षाच्या नेत्यांना पोहोचू दिले नाही, तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा पीटीआयने दिला आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री आणि पीटीआय नेते सोहेल आफ्रिदी यांनी २० लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचा दावा केला आहे. इम्रान खान यांच्याबाबत वाढत्या चिंता आणि तरुणांमधील असंतोषाचा स्फोट होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. पीटीआयने २७ सप्टेंबर रोजी इस्लामाबादकडे लाँग मार्च काढण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी इम्रान खान यांच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना भेटण्याची परवानगी न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयाबाहेर, त्यानंतर अदियाला तुरुंगाबाहेर आणि देशभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयएसआय लिंक प्रकरणी दोघांना अटक; एक पाकिस्तानी असल्याचा संशय

२४ तास चर्चा करा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो!

पाकिस्तानातील पेट्रोल पंपांना १५ ऑगस्ट पासून टाळे

विलेपार्ल्यात ११व्या मजल्यावरील दोन फ्लॅटला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीचा मुद्दा आता अमेरिकेतही पोहोचला आहे. १३ अमेरिकन खासदारांच्या द्विपक्षीय गटाने परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना पत्र लिहून इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या अटकेच्या परिस्थितीबाबत पाकिस्तान सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या दीर्घकाळाच्या एकांतवासाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka