Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'जागा सोडून जा' म्हणत मालवणीत हिंदूंवर हल्ला

'जागा सोडून जा' म्हणत मालवणीत हिंदूंवर हल्ला

पोलिसांकडे कारवाईची मागणी

मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात हिंदू धर्मीय ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्याची माहिती 'सकल हिंदू समाज' यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मालवणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मालवणी परिसरात शुक्रवार, १६ ऑक्टोबरच्या रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. रेहान खान, मोहम्मद सलाम, गोलू शेख आणि अन्य चार ते पाच जणांनी ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील माहितीनुसार, हल्लेखोरांनी 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. तसेच, 'तुम्ही हिंदू इथे का राहता? ही जागा सोडून जा,' असे म्हणत पीडितांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का, तसेच आरोपींविरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.

दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

भारतापुढे दबाव फोल; ट्रम्प यांची शुल्कवाढीवरून माघार

महाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

कोमलचा कांस्यवेध; अमृता सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर!

दरम्यान, मालवणी परिसरात हिंदू कुटुंबांना यापूर्वीही अनेकदा लक्ष्य करण्यात आल्याचा दावा संबंधित पोस्टमध्ये करण्यात आला आहे. परिसरात गांजा आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काही व्यक्तींचा या कथित घटनेशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि मालवणी पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित व्यक्तींची भूमिका तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka