Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशीपसाठी हर्ष राऊतची निवड

जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशीपसाठी हर्ष राऊतची निवड

NEWS डंका 1 month ago

हर्षच्या कामगिरीबद्दल प्रशिक्षक निलेश पाटकर समाधानी

ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेचा खेळाडू हर्ष राऊत याची २-३ मे, २०२६ रोजी बोत्सवानातील गॅबरोन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

जागतिक ॲथलेटिक्सच्या वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेत भाग घेणारा हर्ष हा ठाण्यातील पहिला खेळाडू आहे.

हर्षला त्याच्या या यशाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'एवढ्या मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. या चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा मला विश्वास आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि या प्रवासात मला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचे आभार मानू इच्छितो.'

एनजीओच्या आडून धर्मांतर, लैंगिक शोषणाचा प्रकार; रियाज काजी अटकेत

३० दिवसांत 'धुरंधर २' ची १,७८३ कोटींची कमाई

पाकिस्तानमधील चर्चेसाठी इराणची पाठ!

मणिपूरमधून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त

या वर्षाच्या सुरुवातीला हर्षची भारतीय रिले शिबिरासाठी निवड झाली होती. हर्षचे मागील वर्ष खूप चांगले गेले. त्याने एप्रिलमध्ये जयपूर येथे इंडियन ओपन सिरीजमध्ये आणि त्यानंतर नवी दिल्ली येथे भाग घेऊन आपल्या हंगामाची सुरुवात केली. तो त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेच्या अगदी जवळ पोहोचला. हर्षने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिपमध्ये केवळ अव्वल २४ देश सहभागी होतील. हर्ष प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.

ते म्हणाले की, ठाण्यात ॲथलेटिक्ससाठी अजूनही मूलभूत पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तरीही हर्षने ही कामगिरी करून दाखविली त्याबद्दल अभिमान आहे. आम्हाला आशा आहे की संबंधित अधिकारी अशा प्रकारच्या कामगिरीची दखल घेतील आणि ठाणे शहरातील खेळाडूंना आवश्यक ॲथलेटिक ट्रॅक उपलब्ध करून देतील. या निमित्ताने मी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अशोक आहेर, राजेंद्र मायेकर, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सतीश उचिल आणि ठाणे महानगरपालिकेच्या श्रीमती मिनल पालंदे यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka