Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जैश कनेक्शनप्रकरणी अर्पिता सरकारला झारखंडमधून अटक

जैश कनेक्शनप्रकरणी अर्पिता सरकारला झारखंडमधून अटक

NEWS डंका 3 weeks ago

बंगालमधून अटक केलेल्या जैश संबंधित हमीम मंडलच्या चौकशीतून कारवाई

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातून अर्पिता सरकार हिला अटक केली आहे.

जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या संशयित हमीम मंडलची ती निकटवर्तीय सहकारी असल्याचा आरोप तिच्यावर आहे. हमीम मंडलच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

माहितीनुसार, हमीम मंडलची चौकशी सुरू असताना अर्पिता सरकारचे त्याच्याशी कथित संबंध असल्याचे धागेदोरे समोर आले. त्यानंतर एसटीएफचे विशेष पथक झारखंडमधील साहिबगंज येथे पोहोचले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी रात्री अर्पिता सरकारला अटक करण्यात आली.

यापूर्वी शुक्रवारीच एसटीएफने पूर्व बर्दवान जिल्ह्यातील बर्दवान शहरातील एका गृहनिर्माण संकुलातील फ्लॅटवर छापा टाकून हमीम मंडलला अटक केली होती. त्याच्या निवासस्थानी झडती घेतली असता, पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक आणि हालचालींशी संबंधित काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे शुभेंदू अधिकारी हे संभाव्य लक्ष्य असू शकतात, अशी शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

अर्पिता सरकारच्या अटकेनंतर या संपूर्ण नेटवर्कमध्ये 'हनी ट्रॅप' चा वापर करण्यात आला होता का, याचाही एसटीएफकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील विविध पैलूंचा तपास सुरू असून, अर्पिताला शनिवारी कोलकाता येथील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. पुढील चौकशीसाठी तिची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्थानिक न्यायालयाने हमीम मंडलला १४ दिवसांची एसटीएफ कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अर्पिता सरकारचे नाव समोर आल्यानंतर साहिबगंजमध्ये छापेमारी करून तिला ताब्यात घेण्यात आल्याचे एसटीएफने स्पष्ट केले.

दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत 'नो-ड्रोन झोन'

पप्पू यादवना संसद परिसरातील 'नाटक' भोवले

पीओकेतील हिंसाचारावर ब्रिटनमध्येही संताप; तातडीने हस्तक्षेप करा!

मेलोनी यांनी इटली प्रवेशास स्थलांतरिताना केली बंदी

तपास यंत्रणांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. त्यांच्या मते, हमीम मंडलचे काश्मीरमधील सज्जाद भट गटाशी थेट संबंध होते. सज्जाद भट हा २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हमीम मंडल या गटाशी जवळून संबंधित होता का, याचाही तपास एसटीएफकडून केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka