Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जुहू इस्कॉनच्या रेस्टॉरंटमधल्या अस्वच्छतेवर तुकाराम मुंढेची कारवाई

जुहू इस्कॉनच्या रेस्टॉरंटमधल्या अस्वच्छतेवर तुकाराम मुंढेची कारवाई

NEWS डंका 1 month ago

एफडीएकडून ३ परवाने निलंबित

मुंबईतील जुहू परिसरातील प्रसिद्ध इस्कॉनच्या गोविंदाज रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDAने मोठी कारवाई केली आहे. अन्नपदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत नियमांचे पालन होत नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने गोविंदाज रेस्टॉरंटसह इस्कॉनच्या तीन खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

३ सप्टेंबर रोजी FDAच्या अधिकाऱ्यांनी जुहू येथील हरे कृष्णा लँड परिसरातील खाद्य आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य पद्धतीने वेगळे ठेवले जात नसल्याचे समोर आले. तसेच किटकांचा वावर, अस्वच्छता आणि अन्न साठवण्याच्या पद्धतीत त्रुटी आढळल्या.

गोविंदाज रेस्टॉरंटच्या शीतगृहाजवळ पाणी साचलेले होते. तसेच काही ठिकाणी नाले तुंबलेल्या अवस्थेत आढळले. अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी झाल्याच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले. याशिवाय कच्च्या मालाची खरेदी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि अन्न सुरक्षा प्रशिक्षण याबाबतच्या नोंदींमध्येही त्रुटी आढळल्या.

पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीवरून वाद

अमेरिकन नागरिक व्हॅनडाइकविरोधात यूएपीएअंतर्गत तपास सुरूच!

भारताच्या डिजिटल क्रांतीने जगाचे लक्ष वेधले

अन्न तयार करणाऱ्या आणि हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पुरेशा प्रमाणात झाल्या नसल्याचे FDAच्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे नियमांचे पालन होईपर्यंत संबंधित खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, FDAच्या कारवाईनंतर इस्कॉनकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तपासणीमध्ये बहुतांश व्यवस्था नियमांनुसार असल्याचे सांगत उर्वरित त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने काम सुरू केल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. सर्व नियम आणि स्वच्छतेच्या अटी पूर्ण केल्यानंतरच संबंधित आस्थापने पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळणे ही संबंधित व्यावसायिकांची जबाबदारी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka