Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॅलिफोर्नियात अमेरिकेचे एफ-३५बी लढाऊ विमान कोसळले

कॅलिफोर्नियात अमेरिकेचे एफ-३५बी लढाऊ विमान कोसळले

NEWS डंका 3 weeks ago

वैमानिक सुरक्षित

मेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगो येथील मरीन कॉर्प्स एअर स्टेशन मिरामारजवळ अमेरिकन मरीन कॉर्प्सचे एफ-३५ बी हे अत्याधुनिक लढाऊ विमान शुक्रवारी सकाळी कोसळले.

या घटनेची अमेरिकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली असून, अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने वैमानिकाने वेळेत इजेक्ट केल्याने त्याचा जीव वाचला.

माहितीनुसार, हा अपघात स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता झाला. मरीन कॉर्प्स एअर स्टेशन मिरामारच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'एमसीएएस मिरामारजवळ मरीन कॉर्प्सच्या एफ-३५बी विमानाचा अपघात झाल्याची आम्ही पुष्टी करतो. वैमानिकाने वेळेत इजेक्ट केले असून, त्याला सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.'

माध्यमांच्या वृत्तानुसार, हे लढाऊ विमान थर्ड मरीन एअर विंग अंतर्गत मरीन एअरक्राफ्ट ग्रुप-११ला नियुक्त करण्यात आले होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत चौकशी सुरू आहे. एफ-३५बी हे अमेरिकन मरीन कॉर्प्सचे शॉर्ट टेक-ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग (STOVL) क्षमतेचे अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, एमसीएएस मिरामार हा अमेरिकेतील महत्त्वाच्या लष्करी हवाई तळांपैकी एक असून, येथे अमेरिकेच्या विविध लष्करी शाखांमधील सुमारे १५ हजार जवान तैनात आहेत.

यापूर्वीही अमेरिकेत लष्करी विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टन राज्यात एक अमेरिकन लष्करी लढाऊ विमान कोसळल्याने जंगलात आग लागली होती. त्या घटनेतही वैमानिकाने वेळेत विमानातून बाहेर पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

कुलगाम हल्ल्यामागे लष्कर कमांडर लतीफ भटचा हात?

इटलीनंतर फ्रान्सनेही स्पेन सीमेवर नियंत्रण वाढवले

ओमानच्या किनारपट्टीजवळ तेलवाहू जहाजाजवळ भीषण स्फोट

जैश कनेक्शनप्रकरणी अर्पिता सरकारला झारखंडमधून अटक

तसेच, मे महिन्यात अमेरिकन हवाई दलाचे टी-३८ टॅलॉन II हे प्रशिक्षण विमान पश्चिम अलाबामातील फेयेट काउंटीमध्ये कोसळले होते. त्या वेळीही दोन्ही वैमानिक सुरक्षित बचावले होते. या घटनेची पुष्टी मिसिसिपीमधील कोलंबस एअर फोर्स बेसने केली होती. अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून, एअर फोर्स सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन बोर्ड या प्रकरणाचा तपास करत आहे. कॅलिफोर्नियातील एफ-३५बी अपघाताच्या कारणाचाही तपास सुरू असून, त्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka