Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कांकेरमध्ये भीषण IED स्फोट; 3 DRG जवान शहीद

कांकेरमध्ये भीषण IED स्फोट; 3 DRG जवान शहीद

NEWS डंका 3 weeks ago

डी-माइनिंग ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांचा सापळा

त्तीसगड राज्यातील कांकेर जिल्यात नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. डी-माइनिंग म्हणजेच बारूदी स्फोटके शोधून निष्क्रिय करण्याच्या कारवाईत असताना अचानक झालेल्या आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटात जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) चे तीन जवान शहीद झाले, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना २ मे २०२६ रोजी जंगल भागात घडली असून नक्षलवादाचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांची टीम कांकेर-नारायणपूर सीमेवरील दुर्गम जंगल परिसरात सर्च ऑपरेशन करत होती. या भागात नक्षलवाद्यांनी आधीच बारूदी स्फोटके लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाल्याने जवान डी-माइनिंग मोहिम राबवत होते. याच दरम्यान एका आयईडीला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात चार जवान गंभीर जखमी झाले, त्यापैकी तीन जवानांनी घटनास्थळीच प्राण गमावले.

पश्चिम बंगाल पुनर्मतदानाच्या वेळीही तणाव

'सर्व शक्ती' टँकर सुमारे ४५,००० टन गॅस घेऊन भारतात होणार दाखल

प. बंगालमध्ये १६५ अतिरिक्त मतमोजणी पर्यवेक्षकांसह ७७ पोलिस पर्यवेक्षक तैनात

सूर्यवंशी बाद झाला; जेमिसनला दणका बसला!
या घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये इन्स्पेक्टर सुखराम वट्टी, कॉन्स्टेबल कृष्णा कोमरा आणि कॉन्स्टेबल संजय गढपाले यांचा समावेश आहे. तर कॉन्स्टेबल परमानंद कोमरा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्तव्य बजावताना या जवानांनी दिलेल्या बलिदानामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक तपासानुसार हा स्फोट नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजितपणे लावलेल्या आयईडीमुळे झाला. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी अशा प्रकारचे सापळे रचण्याची पद्धत नक्षलवाद्यांकडून वारंवार वापरली जाते. गेल्या काही काळात बस्तर परिसरात मोठ्या प्रमाणात आयईडी सापडून निष्क्रिय करण्यात आले असले, तरी अजूनही अनेक ठिकाणी धोका कायम असल्याचे या घटनेतून दिसून येते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी छत्तीसगड मोठ्या प्रमाणात नक्षलमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या घटनेमुळे तो धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांची हालचाल कमी झाली असली तरी त्यांचे सापळे अजूनही सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान ठरत आहेत.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू आहे. इतर संभाव्य स्फोटके शोधून निष्क्रिय करण्याचे काम वेगाने सुरू आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
कांकेरमधील हा स्फोट नक्षलविरोधी लढ्याची कठीण आणि धोकादायक वास्तवता पुन्हा एकदा समोर आणतो. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या जवानांची शहादत कायम स्मरणात राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka