Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सूर्यवंशी बाद झाला; जेमिसनला दणका बसला!

सूर्यवंशी बाद झाला; जेमिसनला दणका बसला!

NEWS डंका 3 weeks ago

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काइल जैमीसन याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमक जल्लोष केल्यामुळे आयपीएलकडून कारवाईचा सामना करावा लागला. वैभव सूर्यवंशीची विकेट घेतल्यानंतर केलेल्या वर्तनामुळे जैमीसनला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला असून भविष्यात संयम राखण्याची सूचना करण्यात आली आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेतील आर्टिकल २.५ अंतर्गत जैमीसन दोषी आढळला. या नियमांनुसार प्रतिस्पर्धी खेळाडूचा अपमान होईल किंवा आक्रमक प्रतिक्रिया उद्भवेल अशा प्रकारचे वर्तन निषिद्ध आहे. ही घटना पहिल्या डावातील दुसऱ्या षटकात घडली. सूर्यवंशीने पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बोल्ड झाला. त्यानंतर जैमीसन त्याच्या अगदी जवळ जाऊन जोरात टाळ्या वाजवत आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसला.

या प्रकारामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेषतः १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्याविरुद्ध ३१ वर्षीय जैमीसनने अशा प्रकारे वर्तन केल्याबद्दल चाहत्यांनी टीका केली. जैमीसनने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरी राजीव सेठ यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.

दरम्यान, सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परागने ५० चेंडूत ९० धावा, डोनोवन फरेराने १४ चेंडूत ४७ धावा, तर ध्रुव जुरेलने ३२ चेंडूत ४२ धावा करत संघाला २० षटकांत ६ बाद २२५ धावापर्यंत मजल मारून दिली.

हेही वाचा :

सूर्यवंशी बाद झाला; जेमिसनला दणका बसला!

'शांत, तीव्र आणि निर्णायक' वर्षपूर्तीपूर्वी 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईचे स्मरण

जागतिक स्मार्टफोन मंदीतही भारतात अॅपलची झेप

जनगणनेचा शुभारंभ झालाय, उत्साहाने सामील व्हा…

प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलच्या ४० चेंडूत ७५ धावा, निसांकाच्या ३३ चेंडूत ६२ धावा आणि नितीश राणाच्या १७ चेंडूत ३३ धावा यांच्या जोरावर १९.१ षटकांत ३ बाद २२६ धावा करत ७ विकेट्सने विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka