Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा संदेश

कर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा संदेश

NEWS डंका 3 weeks ago

भारतीय जीवनमूल्ये जगभर पोहोचवण्याचं आवाहन

न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनिवासी भारतीयांना कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्हींबाबत महत्त्वाचा संदेश दिला.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे 'अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग'च्या वतीने आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' कार्यक्रमात ते बोलत होते. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपण ज्या देशात राहतो, काम करतो आणि कमावतो, त्या देशाशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

'अमेरिकेत राहतो, अमेरिकेत कमावतो, त्यामुळे अमेरिकेशी प्रामाणिक राहिले पाहिजे,' असे सांगत भागवत यांनी कर्मभूमीप्रती निष्ठा ठेवण्यावर भर दिला. भारत ही आपली जन्मभूमी असल्याने भारताशी असलेले नातेही कायम जपले पाहिजे. मात्र भारताची अपेक्षा परदेशातील भारतीयांनी आपली कर्मभूमी सोडून भारतासाठी काम करावे, अशी नाही. उपलब्ध वेळ, साधने आणि क्षमतेनुसार भारतासाठी योगदान देता येईल, असे त्यांनी सांगितले.

एचडीएफसी बँकेला मोठा धक्का; सीईओ शशीधर जगदीशन पदावरून पायउतार होणार

पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

भारताने जगाला जगण्याचा एक विचार आणि जीवनमूल्ये दिली आहेत. त्यामुळे परदेशातील भारतीयांनी ही मूल्ये आपल्या आचरणातून पुढे न्यावीत, असा संदेशही भागवत यांनी दिला. कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्ही ठिकाणची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली, तर त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी जगासमोरील वाढत्या समस्यांकडेही लक्ष वेधले. सध्याच्या काळात जगाला मानसिक बळ, आधार आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल केले, तरी त्यातून शाश्वत जीवनपद्धती आणि व्यापक सामाजिक परिवर्तनाला हातभार लागू शकतो, असे भागवत म्हणाले. विविधतेत एकता हा भारताचा महत्त्वाचा विचार असून, तो जगाला दिशा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka