Dailyhunt
कतारमध्ये इराणच्या १० गुप्तहेरांच्या आवळल्या मुसक्या

कतारमध्ये इराणच्या १० गुप्तहेरांच्या आवळल्या मुसक्या

NEWS डंका 1 month ago

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी होते संबंधित

ध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पाचव्या दिवशी प्रादेशिक तणाव आणखी तीव्र झाला आहे. सौदी अरेबियाने आपल्या सुरक्षा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

हा निर्णय क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. दुसरीकडे कतारने Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) शी संबंधित १० संशयित गुप्तहेरांना अटक केली आहे.

बैठकीत इराणने उघडपणे हल्ला केलेल्या मित्र देशांसोबत पूर्ण एकजूट दर्शवण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. सौदी प्रेस एजन्सीच्या निवेदनानुसार, 'कॅबिनेट बैठकीत या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आणि प्रादेशिक सुरक्षा व स्थैर्याला धक्का देणाऱ्या कारवायांविरुद्ध संबंधित देशांना मदत करण्यासाठी किंगडम आपली संपूर्ण क्षमता वापरण्यास तयार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.'

कॅबिनेटने खाडी सहकार्य परिषद (GCC) देशांच्या त्या नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थांचाही आढावा घेतला, जे सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीमुळे सौदी विमानतळांवर अडकले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या सुरक्षित परतीपर्यंत सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

दरम्यान, कतारच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी बुधवारी पहाटे दोन गटांना अटक केली, ज्यांचा कथितरित्या IRGC शी संबंध होता. सात संशयितांना देशातील महत्त्वाच्या व लष्करी पायाभूत सुविधांवर गुप्त नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते, तर उर्वरित तिघे ड्रोन संचालनाचे प्रशिक्षण घेतलेले होते. राज्य वृत्तसंस्थेच्या मते, 'चौकशीदरम्यान संशयितांनी इराणी रिव्होल्यूशनरी गार्डशी असलेले संबंध कबूल केले असून, त्यांना गुप्तहेरगिरी व विध्वंसक कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले.'

एकाच पत्त्यावर २२ बनावट पासपोर्ट! मास्टरमाइंडसह दोघांना अटक

होळीच्या दिवशी मुंबई पोलिसांचा 'खाक्या'; १६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

मृत खामेनी यांचा पुत्र इराणचा सर्वोच्च नेता!

इराणच्या नतान्झ अणुस्थळाला नुकसान!

इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (३ मार्च) तेहरानमध्ये अनेक स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यापूर्वी इराणच्या अणुउपकरणांवर हल्ले झाले होते आणि खाडी परिसरात प्रत्युत्तरात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. बहरीनमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजले, तर इराणने कतारवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. एक क्षेपणास्त्र दोहा येथील अल-उदीद तळाजवळ कोसळले, मात्र जीवितहानीची कोणतीही नोंद नाही. जेरुसलेम परिसरातही स्फोटांचे वृत्त आले असून, इस्रायलने येणारी क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ केल्याचे सांगितले आहे.

अहवालानुसार, इराणमध्ये आतापर्यंत सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाला असून, इस्रायलमध्ये ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तसेच लेबनानमधील बालबेक भागात इस्रायली हल्ल्यांत किमान चार जण ठार झाले आहेत. लेबनानमध्ये एकूण मृतांचा आकडा ५० पेक्षा अधिक असून ३०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka