Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कीवींचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

कीवींचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

NEWS डंका 3 months ago

क्षिण आफ्रिकेने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ३३ धावांनी पराभव करत ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली. न्यूझीलंडच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच टी-२० मालिकाविजय ठरला.

१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातच डळमळीत झाली.

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर कीवी फलंदाजांना लय सापडली नाही. अखेर न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या.

बेवॉन जेकब्सने १९ चेंडूत ३६ धावांची झुंजार खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला टॉम रॉबिन्सन (२५), जिमी नीशम (२४) आणि डेन क्लिव्हर (२२) यांची साथ मिळाली, मात्र मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएट्झी, ओटनिल बार्टमन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव रोखला, तर कर्णधार केशव महाराजने १ विकेट घेतली.

हेही वाचा :

आकाशवाणीवर दररोज संपूर्ण 'वंदे मातरम' प्रसारित होणार

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स १२०० अंकांनी वाढला, निफ्टी २३,३०० पार

भारताची अर्थव्यवस्था मजबूत; FY27 साठी GDP वाढीचा अंदाज ७.१% पर्यंत वाढला

वंदे मातरमविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात साधारण झाली होती. टोनी डी झॉर्जी लवकर बाद झाला, पण वियान मुल्डर (३१) आणि रूबिन हरमन (३९) यांनी संघाला सावरले. त्यानंतर कॉनर एस्टरहुइजनने ३३ चेंडूत ७५ धावांची तुफानी खेळी करत सामन्याचे चित्र बदलले. डियान फॉरेस्टरने १३ चेंडूत नाबाद २१ धावा करत संघाला ४ बाद १८७ धावांपर्यंत नेले.

या शानदार विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka